Wednesday, April 24, 2024
घरमानिनीReligiousMahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या दिवशी करा महादेवांच्या 'या' 5 प्रभावी मंत्राचा जप

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या दिवशी करा महादेवांच्या ‘या’ 5 प्रभावी मंत्राचा जप

Subscribe

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा शुक्रवार, 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवशी महाशिवाची पूजा विधी केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. असे मानले जाते की, या दिवशी व्रत केल्यास सौभाग्य प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासासोबतच महादेवांच्या मंत्राचे आणि स्तोत्राचे पठण केल्याने देखील विशेष फळ प्राप्ती होते.

महादेवांचे प्रभावशाली मंत्र

- Advertisement -

 

  • महादेवांचा मूळ मंत्र

ऊँ नम: शिवाय।।

- Advertisement -

या मंत्राला महादेवांचा मूळ मंत्र म्हटलं जातं. हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.

  •  महामृत्यूंजय बीज मंत्र

ऊँ हौं जूं स: ऊँ भुर्भव: स्व: ऊँ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ऊँ भुव: भू: स्व: ऊँ स: जूं हौं ऊँ।।

या मंत्राच्या पठणाने स्वतःचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य सुधारते. ज्या ठिकाणी हा मंत्र जप केला जातो त्याठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

  • मृत्यूंजय मंत्र

ऊँ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ।।

या मंत्राने व्यक्तीची अकाल मृत्यू, दुर्घटनांपासून सुटका होते.

  • रुद्र गायत्री मंत्र

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥

रुद्र गायत्री मंत्राने व्यक्तीने व्यक्तीची एकाग्रता वाढते.

  • गूढ मंत्र

ॐ जूं स:।

या गूढ मंत्राचा जप केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो.


हेही वाचा :

Mahashivratri 2024 : महादेवाच्या पूजेत करु नका ‘या’ चुका

- Advertisment -

Manini