सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करुन महादेवाचे मनोभावे स्मरण करतो. त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी महादेवांच्या पूजेमध्ये काही खास गोष्टी अर्पण केल्याने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होऊ शकतात.
महाशिवरात्रीला शिवपिंडीवर करा ‘हे’ अर्पण
जल
महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. यामुळे महादेव नेहमी आपल्यावर प्रसन्न राहतात.
दूध
महादेवांना दुग्धाभिषेक देखील प्रिय आहे. यामुळे आजारांपासून सुटका होते.
दही
शिवपिंडीवर दही अर्पण करणं शुभ मानलं जातं. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून सुटका मिळते.
तूप
शिवपिंडीवर तूप अर्पण केल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. शनीच्या साडेसाडीपासून सुटका होते. तसेच कुंडलीतील अशुभ परिणाम कमी होतात.
तांदूळ
महाशिवरात्रीला शिवपिंडीवर तांदूळ अर्पण केल्यास कुंडलीतील मंगळ दोषापासून सुटका होते. कर्ज कमी होण्यास मदत होते.
तीळ
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
हेही वाचा :