हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचे देखील विशेष महत्त्व आहे.
मकर संक्रांतीला करा या गोष्टींचे दान
काळे तीळ
मकर संक्रातीला तीळाची संक्रांत देखील म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी तीळ दान करणं शुभ मानले जाते. यामुळे शनी दोष देखील दूर होतो.
चादर
मकर संक्रांतीच्या दिवशी चादर दान केल्याने कुंडलीतील राहू दोष दूर होतो. त्यामुळे यादिवशी गरीब, गरजू व्यक्तीला काळ्या रंगाची चादर दान करा.
गूळ
मकर संक्रांतीला गूळ दान केल्याने गुरु ग्रह मजबूत होतो. आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते.
खिचडी भात
खिचडी भातामध्ये तांदूळ, उडीद, मूग, भाज्या असतात. जे चंद्र, शनी, गुरु, बुध ग्रहाचे प्रतीनिधत्व करतात. त्यामुळे
मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करावी.
तूप
मकर संक्रांतीच्या दिवशी तूप दान करणं शुभ मानलं जात. तूप दान केल्याने गुरु ग्रह आणि सूर्य ग्रह मजबूत होतो.
हेही वाचा :