हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. 2023 मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाईल. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचे देखील विशेष महत्त्व आहे.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. भोगी आणि मकर संक्रांतीला काय करावे काय करु नये याबाबत आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु शास्त्रात किंक्रांतीच्या दिवशीचे देखील महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.
भोगीच्या दिवशी खेड्यात घर स्वच्छ करुन दारात रांगोळी काढली जाते. तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. तसेच या दिवशी भाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करुन भाजी बनवण्याची प्रथा आहे तसेच मकर संक्रातीला सर्वांना तीळगूळ वाटण्याची प्रथा आहे.
तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला अशुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीने मारले होते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये, तसेच दूरचा प्रवास करु नये. कारण हे अशुभ मानले जाते. भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती किंक्रातीला खावी.
हेही वाचा :