घरभक्तीmakar sankranti special- मकरसंक्राती स्पेशल- तिळगूळाचे लाडू

makar sankranti special- मकरसंक्राती स्पेशल- तिळगूळाचे लाडू

Subscribe

तिळ गूळ दोन्ही गरम पदार्थ असल्याने या दिवसात त्यांचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण तर होतेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

जानेवारी महिन्यात १४ किंवा १५ तारखेला मकरसंक्राती येते. मकरसंक्रात हा वर्षातला पहीलाच दिवस असल्याने या सणाला विशेष महत्व असते. घरोघरी महिला तिळगूळाचे लाडू, तिळ पोळी आणि सुगड पूजन करत संक्रांत साजरी करतात. सुहासिनींना वाण देऊन हळद कुंकू साजरे केले जाते. या दिवशी घरोघरी महिला तीळगूळाचे लाडू बनवतात. यामागे जसे धार्मिक कारण आहे तसेच शास्त्रीय कारणेही आहेत. प्रामुख्याने मकरसंक्रात हा सण हिवाळ्यात येतो. या दिवसात कडाक्याची थंडी असते. तिळ गूळ दोन्ही गरम पदार्थ असल्याने या दिवसात त्यांचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण तर होतेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

साहीत्य- पोलीश तीळ 200 ग्रॅम, गूळ 300 ग्रॅम, भाजलेले शेंगदाणे 50 ग्रॅम, तूप 2 चमचे

- Advertisement -

कृती- सर्वप्रथम कढईत तीळ भाजून घ्यावे. नंतर एका पसरट ताटात ठेवावे. त्या कढईत शेंगदाणे भाजून घ्यावे. त्याचे टरफल काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटावे. नंतर कढईत तूप गरम करावे. गॅस बंद करावा. कढईत सर्व जिन्नस टाकावे. एकत्र करावे. पाच मिनिटांनतर गरम मिश्रण हाताने लाडूसारखे वळावे. एका ताटाला तूपाचा हात लावून त्यात हे लाडू ठेवावे. म्हणजे लाडू ताटाला चिटकत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -