घरभक्तीMohini Ekadashi 2023 : आज श्री विष्णूंनी का घेतला होता मोहिनी अवतार;...

Mohini Ekadashi 2023 : आज श्री विष्णूंनी का घेतला होता मोहिनी अवतार; वाचा संपूर्ण कथा

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी (Ekadashi) म्हटले जाते. आज 1 मे रोजी मोहिनी एकादशीचे व्रत केले जाईल. मोहिनी एकादशी श्री विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी मानली जाते. कारण या दिवशी श्री विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन समुद्रमंथनातून अमृताचे रक्षण केले आणि राक्षसांपासून वाचवून ते देवतांना दिले. आज मोहिनी एकादशीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे भगवान विष्णूची अपार कृपा होते यासोबतच सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात.

मोहिनी एकादशीला करा ‘हे’ उपाय

- Advertisement -

आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला साखर मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात.

आज मोहिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा. तसेच लक्ष्मीची पूजा करावी. यानंतर विष्णुसहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पठण करावे. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

- Advertisement -

मोहिनी एकादशीची पौराणिक कथा

Mohini – The female incarnation of Lord Vishnu | Sagar World Blog

 

मोहिनी हा भगवान विष्णूचा अवतार होता. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर निघाला तेव्हा अमृत कलश कोणी घ्यायचे यावरून दानव आणि देवतांमध्ये वाद झाला. सर्व देवतांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली. अमृताच्या पात्रातून राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णू मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीच्या रूपात प्रकट झाले. अशा प्रकारे सर्व देवतांनी भगवान विष्णूच्या मदतीने अमृताचे सेवन केले.हा शुभ दिवस वैशाख शुक्ल एकादशीचा होता, म्हणून हा दिवस मोहिनी एकादशी म्हणून साजरा केला जातो.

मोहिनी एकादशीची अशा प्रकारे करा पूजा

  • एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

हेही वाचा :

Buddha Purnima 2023 : पौर्णिमेच्या ‘या’ उपायांनी देवी लक्ष्मी होतील प्रसन्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -