Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious Nag panchami 2023 : कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज करा 'हे' महत्त्वाचे...

Nag panchami 2023 : कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज करा ‘हे’ महत्त्वाचे उपाय

Subscribe

श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. याचं महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. आज (21 ऑगस्ट) संपूर्ण देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नागपंचमीचा दिवस काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी खास असतो. अनेकांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो. ज्यामुळे त्या व्यक्तिला आयुष्यात अनेक लहान-मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेचं नागपंचमीचा दिवस कालसर्प दोष दूर करण्यासाठी अतिशय लाभ दायक आहे. असं म्हणतात की, या दिवशी काही खास उपाय केल्याने कालसर्प दोष होऊ शकतो.

नागपंचमीच्या दिवशी दोन शुभ संयोग

यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे कारण या दिवशी पहिला श्रावणी सोमवार देखील आहे. नागपंचमी तिथी 21 ऑगस्ट रात्री 12 : 21 पासून सुरु होणार असून 22 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे नागपंचमी 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

कालसर्प दोष दूर करण्यासाठी करा हे उपाय

- Advertisement -

Bombay High Court refuses to lift ban on capture and exhibition of snakes for festival

  • कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या सापाची लहान मूर्ती घरी आणून त्याची पूजा करा.
  • शक्य असल्यास या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा शक्य असेल त्या भगवान शंकरांच्या तीर्थ क्षेत्रात जावून कालसर्प शांती  केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
  • कालसर्प दोषापासून मुक्ती व्हावी यासाठी तुम्ही कुत्र्यांना दूध-चपाती खाऊ घाला. दररोज या उपाय केल्यास तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल.
  • या दिवशी तुम्ही शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर दूध अर्पण करा.
  • कालसर्प दोष कमी होण्यासाठी ॐ नमः शिवाय या मंत्राचा नियमीत 1008 वेळा जप करा.

हेही वाचा : Nag panchami 2023 : अशा प्रकारे झाली नागांची उत्पत्ती; ‘हे’ आहेत नागांचे माता-पिता

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini