Nirjala Ekadashi 2022 : निर्जला एकादशीच्या दिवशी ‘या’ 3 उपायांनी चमकेल तुमचे भाग्य

एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापा पासून मुक्ति मिळून पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत पकडल्याने आयुष्यात संपन्नता येते. तसेच एकादशी दिवशी केलेले उपाय आपल्या अधिक फलदायी ठरतात

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. यापैकीच ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापा पासून मुक्ति मिळून पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत पकडल्याने आयुष्यात संपन्नता येते. तसेच एकादशी दिवशी केलेले उपाय आपल्या अधिक फलदायी ठरतात. तसेच निर्जला एकादशीला पाण्याचे हे 3 उपाय तुमचे भाग्य चमकवू शकते.

निर्जला एकादशी वेळ
एकादशी प्रारंभ : 10 जून सकाळी 7 वाजून 27 मिनीटांपासून
एकादशी समाप्त : 11 जून सकाळी 5 वाजून 46 मिनीटांपर्यंत

एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ 3 उपाय

  • सकाळी सूर्याला अर्घ्य द्या

हिंदू शास्त्रामध्ये सकाळी उदवत्या सूर्याला अर्घ्य देणं अत्यंत शुभ मानले जाते, प्रत्येक व्यक्तीने सकाळी लवकर उठूण, स्नान करून , सूर्य देवाला अर्घ्य द्यायला हवे. या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होतो. मात्र तुम्हाला जर हा उपाय दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी तरी हा उपाय नक्की करा. या उपायाने सूर्य देव आणि भगवान विष्णू तुमच्यावर खूश होतील.

  • पिंपळाच्या झाडाला पाणी घाला


कर्जापासून मुक्ती हवी असेल तर एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून झाडाखाली एक दिवा लावावा. या उपायाने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

  • जल दान करा


एकादशीच्या दिवशी जल दान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही रस्त्यावरील गरजू व्यक्तींना जल दान करू शकता. या उपायाने तुमचा पितृदोष कमी होईल.

 


हेही वाचा :एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा…