Monday, June 5, 2023
घर मानिनी Religious धनत्रयोदशीच्या दिवशी करा मिठाचे 'हे' उपाय; होईल धनलाभ

धनत्रयोदशीच्या दिवशी करा मिठाचे ‘हे’ उपाय; होईल धनलाभ

Subscribe

दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. अश्विन महिन्याच्या त्रयोदशी दिवशी हा सण साजरा केला जातो. देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर, धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केली जाते. असं म्हणतात की, या दिवशी धनाची पूजा करणं शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी करण्याचे देखील महत्व आहे. धनतेरसच्या दिवशी केली जाणारी खरेदी तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी घेऊन येते. त्यामुळे या दिवशी नक्की कोणत्या वस्तू खरेदी केल्याने लाभ होईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरुप मानले जाते. खरंतर झाडूसोबतच धनत्रयोदशी दिवशी मीठ खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरामध्ये सुख-समृद्धीचा वास होतो आणि आयुष्यातील आर्थिक तंगी दूर होते.

- Advertisement -

धनत्रयोदशीच्या दिवशी करा मीठाचे ‘हे’ उपाय

  • धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच हे खरेदी केलेले मीठ त्या दिवशीच्या जेवणामध्ये वापरल्यास व्यक्तिची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते आणि तुमच्या धनामध्ये वाढ देखील होते.
  • घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये थोडे मीठ एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवा. यामुळे घरातील दरीद्रता दूर होते.
  • या दिवशी घर मीठाच्या पाण्याने पुसून घ्यावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
  • वैवाहिक आयुष्यात सतत वाद-विवाद निर्माण होक असतील तर धनत्रयोदशीच्या रात्री मोठे मीठ तुमच्या शयनकक्षात ठेवा.
  • शास्त्रानुसार मीठ शुक्र आणि चंद्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. अशामध्ये मीठ कधीही स्टील किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेऊ नका. यामुळे चंद्र आणि शनीचा वाईट परिणाम घरातील सदस्यांवर पडतो. त्यामुळे मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवणं शुभ मानलं जातं.

- Advertisement -

हेही वाचा :

धनत्रयोदशीला ‘या’ वस्तू खरेदी केल्याने मिळेल सुख-समृद्धी

- Advertisment -

Manini