घरसणवारPitru Paksha 2021: उद्यापासून पितृ पक्षास सुरूवात; या १५ दिवसात चुकूनही करू...

Pitru Paksha 2021: उद्यापासून पितृ पक्षास सुरूवात; या १५ दिवसात चुकूनही करू नका ‘ही’ कामं

Subscribe

हिंदू धर्मात श्राद्धला खूप महत्व आहे. पितृ पक्षाची सुरुवातअश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पोर्णिमेच्या दिवसापासून होते आणि ती अश्विन अमावस्या तिथीला संपते. हिंदू धर्मामध्ये पालकांची सेवा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. त्यामुळे हिंदू धर्मग्रंथांमध्ये पुत्राला पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक मानले गेले आहे. पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आज, अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या निरोपानंतर, पितृ पक्ष दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्या २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जो ६ ऑक्टोबर रोजी संपेल. पितृपक्षात तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. हरिद्वार, गया इत्यादी देशातील प्रमुख स्थळांना भेट देऊन पूर्वज प्रसन्न होत असल्याचे मानले जाते.

शास्त्रानुसार, १५ दिवस पृथ्वीवर राहिल्यानंतर पितृ पक्ष आपल्या जगात परततात. या दरम्यान, पूर्वज त्यांच्या कुटुंबाभोवती राहतात. त्यामुळे पितृपक्षात फक्त शाकाहारी अन्न सेवन करावे. जर तुम्ही मांसाहारी आणि मद्यप्राशन वगैरे करत असाल तर ते टाळायला हवे. पितृ पक्षात हिंदू लोकं मन, कृती आणि वाणीने संयमाचे जीवन जगतात, पूर्वजांचे स्मरण करून पाणी अर्पण करतात, गरीब आणि ब्राह्मणांना दान करतात. पितृ पक्षात प्रत्येक कुटुंबातील मृत पालकांसाठी श्राद्ध केले जाते. श्राद्ध विधी करणाऱ्यांनी या दिवसात केस आणि नखे कापू नयेत. त्यांनी ब्रह्मचर्य देखील पाळावे. दिवसा श्राद्ध कर्म करावे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते. या दिवसांमध्ये गूळ, काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरीच्या भाज्या खाऊ नयेत. प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नये.

- Advertisement -

पितृपक्षाच्या वेळी जर तुमच्या घरात कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्या. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात. पितृपक्षात केळीच्या पानावर किंवा पत्रावळीमध्ये खा आणि ब्राह्मणांनाही पानावर खाऊ घातल्यास ते फलदायी ठरेल. तर पितृपक्षात लग्न, साखरपुडा, मुंडण, नवीन घरात प्रवेश, घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी असे कोणतेही शुभ कार्य करू नका. नवीन कपडे किंवा कोणत्याही प्रकारची खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते. या दरम्यान, अत्यंत साधे जीवन जगण्यास आणि सात्विक अन्न खाण्यासही सांगितले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -