आमदारांकडून राजकीय होळीच्या शुभेच्छा

राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक महिन्याला राजकारणात रंग बदलताना दिसत आहेत. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्याच होळी हा सण साजरा करण्यात येत आहे. होळीनिमित्त विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी राजकीय होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांदरम्यान टोलवा-टोलवी देखील पाहायला मिळाली आहे.