Rakshabandhan 2022: भावाला राखी बांधताना किती गाठी बांधणे शुभ असते?

रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना नेमक्या किती गाठी बांधाव्यात आणि राखी बांधण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ आहे हे जाणून घेऊ.

रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक भाऊ – बहिणीसाठी खूप विशेष असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली आहे. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं वेगळेपण सांगणारा हा सण प्रत्येक भाऊ – बहिणीसाठी खास असतो. बहिणीची आपल्या भावासाठी राखी घेण्यासाठी तर भावाची आपल्या बहिणीसाठी गिफ्ट घेण्याची लगबग सुरु असते. प्रत्येक जण हा सण खूप उत्सहात आणि आनंदात साजरा करतात. पण रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना नेमक्या किती गाठी बांधाव्यात आणि राखी बांधण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ आहे हे जाणून घेऊ.

हे ही वाचा – रक्षाबंधन विशेष : भावासाठी चुकूनही घेऊ नका अशी राखी, का? ते वाचा

राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ असते

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधताना तीन गाठी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार तीनगाठी बांधणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींना हिंदू धर्मात खूप महत्व आहे. त्यामुळे याच त्रिमूर्तींवरूनच रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते.

हे ही वाचा – रक्षाबंधन 2022 : रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या शुभमुहूर्त

राखी बांधताना कोणत्या दिशेला बसावे

धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भाऊ पूर्व दिशेकडे आणि बहीण पश्चिमेकडे तोंड कडून बसणे शुभ मानले जाते. त्याच बरोबर राखी बांधताना पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते, दुसरी गाठ भाऊ आणि बहिणीसाठी पुढील आयुष्य आनंददायी जावं यासाठी तर राखीची तिसरी गाठ भाऊ – बहिणीच्या नात्यातील गोडवा जपण्यासाठी बांधली जाते.

राखी बांधण्यासाठी शुभ वेळ आणि मुहूर्त

या वर्षी राक्षबंधन हा सण ११ ऑगस्ट २०२२ गुरुवारी साजरा केला जाणार आहे. त्यादिवशी सकाळी ९: ३५ पासून पौर्णिमा सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रातील ‘शुभकरं पुच्छं एवम् वासरे शुभकारी रात्रौ’ या तत्वानुसार ११ ऑगस्ट गुरुवारी संध्याकाळी ५: ४० नंतर शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर १२ ऑगस्ट २०२२ रोजी सुद्धा शुभ मुहूर्त असल्यामुळे सकाळी ७: १६ पर्यंत तुम्ही राक्षबांधन साजरे केले जाणार आहे.

हे ही वाचा – Hindu Shastra : श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ