Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर सणवार Ram Navami 2021: ९ वर्षानंतर राम नवमीनिमित्त शुभ योग; जाणून घ्या, शुभ...

Ram Navami 2021: ९ वर्षानंतर राम नवमीनिमित्त शुभ योग; जाणून घ्या, शुभ मुहूर्त

Related Story

- Advertisement -

राम नवमीचा उत्सव भगवान रामाचा जन्म दिन तसेच भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीची तारीख २१ एप्रिल बुधवारी येत आहे. हिंदू धर्मात राम नवमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, राम नवमी ग्रहांचे एक संयोजन तयार होत आहे. नऊ वर्षानंतर पाच ग्रहांच्या शुभ योगामुळे रामनवमीचे महत्त्व अधिक वाढले आहे. तर २०१३ मध्ये देखील असाच योग आला हेता.

धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान श्री राम यांचा जन्म दुपारी १२ वाजता कर्क लग्न आणि अभिजीत मुहूर्तामध्ये झाला होता. यावेळी राम नवमीची पूजा म्हणजे आश्लेषा नक्षत्र, लग्नातील स्वग्रही चंदमा, सातव्या घरात शनि, दहाव्या घरात सूर्य, बुध, शुक्र आहे. ग्रहांचे संयोजन या दिवशी उत्सव शुभ होणार आहे. या दिवशी करण्यात आलेल्या पूजा अर्चनाबरोबरच वस्तूंची खरेदी देखील समृद्ध आणि शुभ असणार आहे.

राम नवमीचा शुभ मुहूर्त

  • नवमी तिथी आरंभ: २१ एप्रिल रात्री ००.४३ वाजेपासून
  • नवमी तिथी समाप्ती: २२ एप्रिल रात्री ००.३५ वाजेपर्यंत
  • पूजेता मुहूर्त: प्रात: ११ वाजून २ मिनिटांपासून दुपारी ०१ वाजून ३८ मिनिटांपर्यंत
  • पूजेचा एकूण कालावधी: २ तास ३६ मिनिट
  • रामनवमी मध्याह्न वेळ: दुपारी १२ वाजून २० मिनिटं

म्हणून साजरी केली जाते रामनवमी

- Advertisement -

भगवान राम यांचा जन्म सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशमध्ये त्रेता युगात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणून अयोध्येत झाला होता. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तारखेला झाला होता. हिंदू शास्त्रानुसार राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. म्हणून हा उत्सव देशभरातील हिंदूंमध्ये धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी भक्त बालक रुपात भगवान रामची पूजा करतात. अयोध्या शहर भगवान राम यांचे जन्मस्थान आहे, म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येथे पोहोचतात. भाविक हा शुभ दिवस उपवास करुन आणि राम कथा पाठ करुन साजरा करतात. दरम्यान, काही लोक अयोध्येच्या काठी वसलेल्या सरयू नदीत स्नान करतात. लोकप्रिय मान्यतेनुसार या दिवशी पवित्र पाण्याने स्नान करणे शुभ मानले जाते.

 

- Advertisement -