घरभक्तीRam Navami 2022 : राम नवमीला बनतोय त्रिवेणी संयोग, जाणून घ्या शुभ...

Ram Navami 2022 : राम नवमीला बनतोय त्रिवेणी संयोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पौराणिक कथा

Subscribe

या वर्षी राम नवमीला रवि पुष्य योग , सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग अश्या तीन उत्तम योगांचा त्रिवेणी संयोग बनलेला आहे. त्यामुळे हे तीन योग येत्या राम नवमीला सर्वाधिक शुभ बनवणार आहेत.

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, त्यामुळे आपण प्रत्येक वर्षी चैत्र नवरात्रीच्या नवमीला राम नवमी साजरी करतो. संपूर्ण भारतात या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजारा केला जातो. तसेच या वर्षी राम नवमीला रवी पुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग अशा तीन उत्तम योगांचा त्रिवेणी संयोग बनलेला आहे. त्यामुळे हे तीन योग येत्या राम नवमीला सर्वाधिक शुभ बनवणार आहेत. या दिवशी नवीन घर, वाहन तसेच नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी उत्तमोत्तम आहे.

राम नवमी २०२२ शुभ मुहूर्त
चैत्र शुक्ल नवमी तिथी : १० एप्रिल २०२२ रोजी
नवमी तिथी सुरूवात : १० एप्रिल रात्री १ वाजून ३२ मिनिटांपासून
नवमी तिथी समाप्त : ११ एप्रिल सकाळी ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत
पूजेचा मुहूर्त : १० एप्रिल सकाळी ११ वाजून १० मिनिट ते दुपारी १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत

- Advertisement -

राम जन्मोत्सव


प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म अयोध्येत झाला होता, त्यामुळे प्रत्येक वर्षी अयोध्येत राम नवमी मोठ्या आनंदात साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण अयोध्या राम नामाचा जयघोष करते, तसेच रामायण आणि रामचरितमानस यांचा पाठ केला जातो.

- Advertisement -

राम नवमी पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा ७ वा अवतार होते. त्रेतायुगातील भूमीवर राक्षसांनी हाहाकार माजवला होता, तेव्हा भगवान विष्णूंनी राजा दशरथ आणि कौशल्या यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. हा दिवस होता चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीचा. धर्माच्या रक्षणासाठी श्रीरामांनी संपूर्ण आयुष्यपणाला लावले. त्यामुळे पुरुषोत्तम म्हणून देखील संबोधल जातं.


हेही वाचा : Surya Grahan 2022 : शनिश्चरी अमावास्येला असेल ‘या’ वर्षाचे पहिले सूर्यग्रहण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -