Ram Navami 2023 : रामनवमीला करा रामरक्षा स्तोत्राचे पठण; आहेत अगणित फायदे

हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी श्री रामांचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदा रामनवमी 30 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. असं म्हणतात, या दिवशी श्री रामांच्या पूजेसोबतच त्यांच्या रामरक्षा स्तोत्राचे पठण देखील आवर्जुन करावे. यामुळे आयुष्यातील अनेक संकटांपासून सुटका होण्यास मदत होते.

रामरक्षा स्तोत्राचे अगणित फायदे

Ram Navami: 15 things to know about Lord Rama | India.com

  • रामरक्षा स्तोत्राची निर्मिती भगवान शंकराच्या सांगण्यावरून बुद्ध कौशिक ऋषींनी केली होती. भगवान शंकराने त्यांना स्वप्नात हा स्रोत रचण्याची प्रेरणा दिली होती. त्यामुळे या स्तोत्राचे पठण केल्याने महादेव देखील प्रसन्न होतात.
  • रामरक्षा स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीवर श्री राम नेहमीच कृपा करतात.
  • रामरक्षा स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीमध्ये सकारात्मक भावनांचा संचार होतो.
  • रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठण केल्याने श्री हनुमानजी प्रसन्न होतात आणि राम भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात.
  • रामरक्षाच्या नियमित पठणाने मनातील भीती दूर होते. तसेच यामुळे आरोग्यासंबंधित समस्या देखील ठीक होतात.
  • रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने दीर्घायुष्य, संतान, शांती, विजय, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.
  • जो व्यक्ती रोज रामरक्षा स्तोत्राचा पाठ करतो, तो येणाऱ्या अनेक संकटांपासून वाचतो.

 हेही वाचा :

Ram Navami 2023 : कसा झाला श्रीरामांचा मृत्यू? यामुळे कारणामुळे संपवले अवतारकार्य