पंचमी साजरी केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी चुकून झालेल्या चुकिचे प्रायश्चित करण्यासाठी हा उपवास केला जातो. ऋषिपंचमीचे हे व्रत महिला आणि पुरूष दोघेही करतात. या दिवशी सात ऋषींची पूजा देखील केली जाते आणि त्यांचा आर्शिवाद प्राप्त केला जातो. यामध्ये कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ हे सप्त ऋषि आहेत. या वर्षी 1 सप्टेंबर रोजी ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे.
ऋषिपंचमीचे व्रत कसे कराल?
- ऋषिपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घ्या आणि स्वच्छ हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता घर स्वच्छ करून देवघराजवळ एक चौरंग ठेवा. त्यावर वस्त्र अंधरून सप्त ऋषिंचा फोटो ठेवा आणि त्यांच्या फोटोसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवा.
- सप्त ऋषिंना धूप-दीप दाखवून पिवळ्या रंगाची फुलं आणि फळं, मिठाई अर्पण करा. आता सप्त ऋषिंकडे आपल्या चुकांची माफी मागा आणि दुसऱ्यांना नेहमी मदत कराल असा संकल्प करा. व्रत कथा ऐकल्यानंतर आरती आणि नैवेद्य अर्पण करा. घरातील मोठ्यांचे आर्शिवाद घ्या.
ऋषिपंचमीची कथा
पौराणिक कथेनुसार, विदर्भामध्ये उत्तक नावाचे एक ब्राह्मण आपल्या पत्नी सोबत राहायचा. एक मुलगा आणि एक मुलगी अशी त्यांना दोन मुलं होती. एक योग्य मुलगा पाहून त्या ब्राह्मणाने त्याच्या मुलीचे लग्न लावून दिले. परंतु काही दिवसांनंतर अचानक त्याच्या जावयाचा अकाल मृत्यू झाला. त्यानंतर त्याची विधवा मुलगी आपल्या माहेरी निघून आली. एक दिवस ती मुलगी झोपली असताना, तिच्या आईने त्या मुलीच्या शरीरामध्ये कीडे तयार होत असल्याचं पाहिलं. हे पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली. उत्तक ब्राह्मणाने ध्यान लावून पाहिले की, पूर्वजन्मात त्याची मुलगी ब्राह्मण कन्या होती. परंतु तिने तिच्या अशुद्ध काळात काही चूका केल्या होत्या. तसेच ऋषिपंचमीचे व्रत देखील केले नव्हते. त्यामुळे तिची ही वाईट अवस्था झाली होती.