घरभक्तीSankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीला बनतोय 'हा' अद्भुत संयोग! जाणून घ्या शुभ...

Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीला बनतोय ‘हा’ अद्भुत संयोग! जाणून घ्या शुभ मुहूर्त

Subscribe

या दिवशी संकष्टी चतुर्थी सोबतच सर्वार्थ सिद्धि योग सुद्धा आहे. या काळात केलेली पूजा-पाठ आणि शुभ काम खूप फळ देणारे ठरतात

गणपती बाप्पाचा आर्शिवाद प्राप्त करायचा असेल तर संकष्टी चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम मानला गेला आहे. या महिन्यात १७ जून रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पकडले जाईल. या दिवशी संकष्टी चतुर्थी सोबतच सर्वार्थ सिद्धि योग सुद्धा आहे. या काळात केलेली पूजा-पाठ आणि शुभ काम खूप फळ देणारे ठरतात. या दिवशी भगवान गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केल्यास त्याचे उत्तम फळ तुम्हाला मिळते.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

- Advertisement -
  • ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी १७ जून, शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजून १० मिनीटांनी सुरू होणार १८ जून, शनिवारच्या रात्री २ वाजून ५६ मिनीटांनी समाप्त होईल.
  • १७ जून रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ९:५६ पासून ते १८ जून सकाळी ५:०३ पर्यंत सर्वार्थ सिद्धि योग राहिल.
  • या दिवशी अभिजीत मुहूर्त १७ जून सकाळी ११:३० पासून ते दुपारी १२:२५ पर्यंत असेल. तसेच चंद्रोदयाची वेळ रात्री १०:०३ असेल.

अशा प्रकारे करा संकष्टी चतुर्थीची पूजा


संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. शुभ मुहूर्तावर श्री गणेशांचा अभिषेक करा. त्यांना चंदन, फळ, लाल फुल, धूप, दीप, दुर्वा, अक्षता, मोदक अर्पण करा. तसेच श्रीगणेश चालीसेचे पठण करा. श्रीगणेशांची आरती करा.रात्री चंद्रोदयानंतर व्रताचे उद्यापन करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -