घरसणवारShardiya Navratri 2021: जाणून घ्या, कधी असणार शारदीय नवरात्री आणि दसरा

Shardiya Navratri 2021: जाणून घ्या, कधी असणार शारदीय नवरात्री आणि दसरा

Subscribe

अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस हा उत्सव चालतो म्हणून त्यास नवरात्रौत्सव असे संबोधले जाते आणि १० व्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंर आजपासून पितृ पक्षास सुरूवात झाली असून या वर्षी १६ दिवसांचा कालावधी असणार आहे. आजपासून सुरू होणारा पितृ पक्ष अश्विन अमावास्येला ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून शारदीय नवरात्रीला अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेने सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्र गुरुवार, ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून या दिवशी घटस्थापना करण्यात येते आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा केली जाते. जाणून घ्या नवरात्रीसंदर्भांत

शारदीय नवरात्रीची सुरुवात ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना केली जाते. यासाठी घटस्थापना मुहूर्त सकाळी ६.१७ ते सकाळी ७.७ दरम्यान असणार आहे. यावेळी माँ शैलपुत्रीची पूजा देखील केली जाते.

- Advertisement -

नवरात्रीचा दुसरा दिवस ८ऑक्टोबर, शुक्रवार या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. नवरात्रीचा तिसरा दिवस ९ ऑक्टोबर, शनिवार. या दिवशी माँ चंद्रघंटा आणि माँ कुष्मांडा या देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीचा चौथा दिवस १० ऑक्टोबर, रविवार या दिवशी आई स्कंदमातेची पूजा केली जाते. नवरात्रीचा पाचवा दिवस ११ ऑक्टोबर, सोमवार या दिवशी माँ कात्यायनीची या देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीचा सहावा दिवस १२ ऑक्टोबर, मंगळवार या दिवशी आई कालरात्रीची पूजा केली जाते.

तसेच, नवरात्रीचा सातवी दिवस १३ ऑक्टोबर, बुधवार या दिवशी दुर्गा अष्टमी माँ महागौरी मातेची पूजा केली जाते. नवरात्रीचा आठवा दिवस १४ ऑक्टोबर, गुरूवार. या दिवशी कन्या पूजन केले जाते. नवरात्रीचा दहावा दिवस १५ ऑक्टोबर, शुक्रवार या दिवशी दुर्गा विसर्जन केले जाते. तर काही ठिकाणी नवरात्रीचे उपवास सोडले जातात आणि याच दिवशी यंदा दसरा देखील आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -