घरसणवारजन्माष्टमीनिमित्त 'या' मंदिरात राधा कृष्णाला सजवला जातो कोट्यवधींचा श्रृंगार

जन्माष्टमीनिमित्त ‘या’ मंदिरात राधा कृष्णाला सजवला जातो कोट्यवधींचा श्रृंगार

Subscribe

श्री कृष्णजन्माष्टमी उत्सव देशभरात साजरा केला जातो. अशातच मध्यप्रदेशातील ग्वालियरमधील श्री कृष्णा-राधे माताच्या  मंदिरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे या मंदिरातील श्री कृष्णा-राधे मातेच्या मूर्तींना कोट्यावधींच्या सोन्याच्या दागिन्यांचा साज श्रृंगाराने सजवले जाते. सिंधिया संस्थान काळातील हे शेकडो वर्ष पुरातन दागिने आहेत. या दागिन्यांवर मोत्यांऐवजी रत्नजटीत हिरे, पाचू, माणिक, पुखराज नीलमसारखे मौल्यवान धातू वापरले आहेत. या धातूंची किंमत जवळपास १०० कोटींच्या घरात आहे. यात सोन्याचे मुकुट, हिऱ्यांचा हार पन्नेजडीत दागिन्यांचा समावेश आहे. या दागिन्यांभोवती अशाप्रकारे कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे की, या मौल्यवान दागिन्यांना बँक लॉकरपासून ते मंदिरापर्यंत आणण्यासाठी आणि पुन्हा मोजून बँकेत ठेवण्यासाठी तब्बल १०० सुरक्षा रक्षकांचा कडा पहारा ठेवण्यात आला आहे.

सिंधिया राजेशाहीच्या काळात फुलबागमध्ये या गोपाळ मंदिराची निर्मिती करण्यात आली. १९२१ च्या काळातील सिंधिया संस्थानचे तत्कालीन महाराजा माधवराव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. राधा-कृष्ण देवांसाठी सिंधिया राजांनी दागिने बनवले. स्वातंत्र्यापूर्वी या मंदिराची देखरेख सिंधिया राजेशाहीतील लोक करत होते. मात्र स्वातंत्र्यानंतर सिंधिया राजवंशाने हे दागिने भारत सरकारच्या स्वाधीन केले. नगरपालिका परिषदेने या दागिन्यांना बँक लॉकरमध्ये ठेवले. यानंतर २००७ साली पुन्हा एकदा राधाकृष्ण यांना साजश्रृंगाराने सजवण्यात आले.

- Advertisement -

या मंदिराशी संबंधित काही लोक सांगतात की, या मंदिराची देखरेख सिंधिया राजघराण्यामार्फत केली जायची. मात्र स्वातंत्र्यानंतर हे रत्नजटीत किमती दागिने भारत सरकारच्या स्वाधीन सुपूर्त केले. मात्र त्यानंतर या दागिन्यांकडे कोणी लक्षचं दिले नाही. परंतु २००७ साली नगरपालिका परिषदेचे आयुक्त पवन शर्मा यांनी या संपत्तीबद्दल माहिती शोधून काढली. यानंतर श्री कृष्णजन्माष्टमीनंतर राधा-कृष्ण देवांच्या मूर्तींना किमती दागिन्य़ांचा साजश्रृंगार चढवण्याची प्रथा सुरु झाली. राधा-कृष्णाच्या मूर्तीला जवळपास १०० कोटी रुपयांचे दागिन्यांनी सजवले जाते. मात्र या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी कडा पहारा असतो.


शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -