पहिल्या श्रावणी सोमवारचं महत्त्व; आजच्या दिवशी जुळून येत आहेत ‘हे’ योग

श्रावणी सोमवारी केलेली महादेवांची पूजा आणि व्रत हे खूपच लाभदायी असतं. श्रावणी सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

हिंदू धर्मात श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो. श्रवणात केलीली पूजा, व्रत किंवा उपास हे विशेष फलदायी ठरतात. त्याचबरोबर श्रावणात केलेली महादेवांची पूजा देखील विशेष लाभदायी ठरते. १ ऑगस्ट २०२२ रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणातले सोमवार विशेष असतात. श्रावणी सोमवारी केलेली महादेवांची पूजा आणि व्रत हे खूपच लाभदायी असतं. श्रावणी सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

हे ही वाचा –  Hindu Shastra : पहिल्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करा ‘ही’ शिवामूठ; भगवान…

ज्योतिषांच्या मते, श्रवणातलया पहिल्या सोमवारी अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं सुद्धा महत्व वाढलं आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारचे शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व जाणून घेऊया

 

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी विनायक चतुर्थीचा योग 

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी विनायक चतुर्थीचा अतिशय शुभ योग आहे. विनायक चतुर्थीचा उपवास हा श्री गणेशाला समर्पित समर्पित केला जातो. या दिवशी शिवयोग आणि रवियोगही तयार होत आहेत. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य सफल होते.

हे ही वाचा –  Hindu Shastra : …म्हणून शिवपिंडीवर केला जातो जलाभिषेक

पहिल्या  श्रावणी सोमवारचे शुभ योग

– चतुर्थी १ ऑगस्ट सकाळी ४ वाजून १८ मिनिटांपासून

-चतुर्थी तिथी समाप्त – २ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजून १३ मिनिटं

-परीघ योग – ३१जुलै सायंकाळी ७.११ ते १ ऑगस्ट रात्री ७ वाजून १३ मिनिटं

-शिवयोग – १ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटं ते २ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

-रवि योग – १ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ४२ मिनिटं ते दुपारी ४ वाजून ६ मिनिटांपर्यंत

हे ही वाचा –  श्रावणात मांसाहार का करू नये? काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व?

श्रावणी सोमवारचे व्रत आणि उपासनेची पद्धत 

-सकाळी देव पूजा करताना घरातील देव्हाऱ्यात दिवा लावावा.

-गंगाजलाने सर्व देवतांचा अभिषेक करा .

-शंकराच्या पिंडीवर गंगाजल आणि दूध अर्पण करा.

-शंकराला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करा त्याचबरोबर बेलाचे पण सुद्धा चर्वण करा.

-भगवान शंकराची आरती अरुण  प्रसाद अर्पण करा. तुम्ही एखाद्या विशेष गोड पदार्थाचा नैवेद्य सुद्धा महादेवांना अर्पण करू शकता.

-मन शांत ठेऊन भगवान शंकरांची आराधना करा, मनोभावे पूजा करा

-पूजा करताना तुम्ही देवाला धूप सुद्धा दाखवू शकता.

-जर का  महादेव तुमचं ग्रामदैवत किंवा कुलदैवत असेल तर तुम्ही रिज नित्यनेमाने आणि मनोभावे त्यांची पूजा केली पाहिजे.