घरसणवारSomvati Amavasya 2021: जाणून घ्या सोमवती अमावस्येचे महत्त्व, नियम आणि उपाय

Somvati Amavasya 2021: जाणून घ्या सोमवती अमावस्येचे महत्त्व, नियम आणि उपाय

Subscribe

हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना विशेष असं महत्त्व आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीवर अमावस्या येते. यावेळी अमावस्या सोमवारी येत आहे. म्हणून त्याला ‘सोमवती अमावस्या’ म्हटले जाते. जेव्हा सूर्य आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा अमावस्या असते. या तिथीला राहू आणि केतूची पूजा विशेषतः फलदायी असते. या दिवशी दान आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे आणि विशेष प्रयोगांचे विशेष फायदे आहेत. सोमवारी अमावास्या येत असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्या ६ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज साजरी केली जात आहे.

सोमवती अमावस्येचे महत्त्व

सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. याशिवाय पितरांना तर्पणदेखील दिले जाते. यामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. मान्यता आहे की, जर कुणाच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी विधीवत पूजा केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते. याशिवाय, सोमवार असल्याने महादेवाची पूजा अवश्य करावी.

- Advertisement -

अमावस्या खबरदारी आणि नियम

सोमवती अमावस्येच्या दिवशी अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी पूर्वजांसाठी दान करा. या दिवशी जनावरांना हिरवा चारा द्यावा. शक्य असल्यास, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रकाश पडेल अशी व्यवस्था करा.

आरोग्य समस्यांवर उपाय

  • सोमवती अमावस्येला खीर बनवून ती भगवान शंकराला अर्पण करा. पूर्वजांच्या नावाने काही भाग काढून टाका. भगवान शंकराला अर्पण केलेली खीर गरिबांमध्ये वाटून घ्या.
  • सोमवती आमवस्येला आंघोळ करून केशरी कपडे परिधान करा. भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करा. “ओम गौरीशंकराय नमः” चा जप करा. सात्त्विक अन्न बनवून त्याचे दान करा.
  • सोमवती अमावस्येला पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान करू शकत नसल्यास पाण्यात गंगाजल मिसळा आणि त्या पाण्याने स्नान करा. यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. असे केल्याने आपण आजारांपासून दूर राहातो.
  • या खास दिवशी शिव आणि पार्वतीसोबतच तुळशीच्या झाडाची पूजा करावी. सोमवती अमावस्येच्या दिवशी, तुळशीच्या झाडाच्या भोवती १०८ वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने घरात पैशांची अडचण होत नाही.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -