Somvati Amavasya : पितृदोष कमी करण्यासाठी सोमवती अमावास्येला करा ‘हे’ अचूक उपाय

या वर्षी ३० मे रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जात आहे. या दिवशी शनी जयंती सुद्धा असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक वाढत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते, वर्षातून एक किंवा दोन वेळाच सोमवती अमावस्येचा शुभ योग बनतो. त्यामुळे या शुभ योगात तीर्थ स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. सोमवती अमावस्येचे महत्त्व महाभारतात भीष्म पितामह यांनी युधिष्ठिर ला सांगितल्याचे वर्णन आहे. हा दिवस पितृ दोषाचे उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हे उपाय केल्यास नक्कीच पितृ दोष कमी होऊ शकतो.

पितृ दोष कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

  • सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही तीर्थ स्नानवर जाऊन पितरांचे श्राद्ध, तर्पण करा. पूजेनंतर गरजू व्यक्तींना जेवण, धान्य, भांडी, कपडे इ. वस्तू दान करा. हे उपाय केल्यास तुमचे पितृ देवता तुमच्यावर खूप खूश होतील.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच माश्यांसाठी नदी किंवा तलावामध्ये कणकेचे लहान लहान गोळे बनवून पाण्यामध्ये सोडा. या उपायामुळे तुमच्या पितरांना शांती मिळेल.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी दूधामध्ये काळे तीळ आणि पानी घालून पिंपळाच्या झाडाला घाला. यासोबतचं पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला.
  • या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या किंवा राईच्या तेलाचा दिवा लावा.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करा. शिव मंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या पिंडिचे दर्शन घ्या. या उपायाने तुमचा पितृ दोष कमी होण्यास मदत होईल.

पुढील सोमवती अमावस्या कधी असेल?
ज्योतिषार्यांच्या मते, २०२२ मध्ये सोमवती अमावस्याचे पहिला संयोग ३१ जानेवारी रोजी बनला होता. त्याचं बरोबर सोमवती अमावस्येचा दूसरा संयोग ३० मे रोजी बनलेला आहे. आता यानंतर २०२३ मध्ये २० फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्याचे शुभ योग बनणार आहे.


हेही वाचा :शनी जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘या’ गोष्टींचे दान; संपूर्ण वर्षभर मिळणार फायदा