Friday, April 19, 2024
घरमानिनीReligiousकपाळावर टिळा लावण्याचे काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

कपाळावर टिळा लावण्याचे काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Subscribe

हिंदू धर्मात अशा अनेक प्रथा, परंपरा आहेत ज्यांचे महत्व आणि लाभ शास्त्रामध्ये देखील सांगण्यात आल्या आहेत. या प्रथेमध्ये घरामध्ये दररोज शंख वाजवणे, जमीनीवर बसून जेवण करणे, हात जोडून नमस्कार करणे तसेच कपाळावर टिळा(टिकली) लावणे. यांसारख्या अनेक मान्यता आहेत. हिंदू धर्मातील या परंपरा आणि मान्यता पौराणिक काळापासून सुरु आहेत. आताच्या एकविसाव्या शतकातील अनेक लोकही या परंपरेचं प्रकर्षाने पालन करतात. कपाळावर टिळा लावण्यामागे हिंदू धर्मात अनेक धार्मिक प्रथा आहेत. मात्र, या मागे फक्त धार्मिक महत्वासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन देखील सांगण्यात आला आहे.

कपाळावर टिळा(टिकली) लावण्याचे धार्मिक महत्व

- Advertisement -

Scientific Reason behind Tilak on Forehead - InstaAstro

  • धार्मिक मान्यतेनुसार, कपाळावर टिळा लावल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारते तसेच कुंडलीतील उग्र ग्रह शांत होतात.
  • कपाळावर कुंकू, चंदन, हळद,भस्म, अष्टगंध लावले जाते.
  • असं म्हणतात की, कपाळावर टिळा(टिकली) लावल्याने व्यक्तिचे डोकं शांत राहते.
  • जेव्हा कोणत्याही शुभ कार्यासाठी तुम्ही घराबाहेर पडत असाल अशावेळी देखील टिळा लावणं शुभ मानलं जातं. यामुळे प्रत्येक कामात यश मिळते.
  • देवीच्या पूजेदरम्यान देखील टिळा लावला जातो.
  • दररोज कुंकवाचा टिळा कपाळावर लावणं भाग्यकारक मानलं जातं. तसेच हळदीचा टिळा लावल्याने त्वचे संबंधीत रोग दूर होतात.

कपाळावर टिळा(टिकली) लावण्याचे वैज्ञानिक महत्व

- Advertisement -

  • कपाळावर टिळा लावल्याने व्यक्तिला कोणतेही कार्य करण्यास मदत होते.
  • टिळा दोन्ही भुवयांच्या मध्ये लावला जातो. आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आज्ञा चक्र असते. असं म्हणतात की, आज्ञा चक्रावर टिळा लावल्याने एकाग्रता वाढायला मदत मिळते.
  • वैज्ञानिकांच्या मते, कपाळावर टिळा लावल्याने डोक्यामध्ये सेरोटिनिन आणि बीटा-एंडोर्फिनचा स्त्राव संतुलित राहतो.
  • बोटाने माथ्यावर टिळा लावताना कपाळावर दबाव पडतो. यामुळे नसांचा रक्त संचार स्थिर राहतो.

हेही वाचा :

देवउठनी एकादशीला 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होणार भगवान विष्णू; जाणून घ्या तुळसी विवाहाचे महत्त्व

- Advertisment -

Manini