घरसणवारGaneshotsav2021: मानवी चेहऱ्यातील बाप्पाचे अद्भभुत रूप!

Ganeshotsav2021: मानवी चेहऱ्यातील बाप्पाचे अद्भभुत रूप!

Subscribe

राज्यासह देशभरात बाप्पाचे आगमन झाले असून बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहे. गणेशोत्सव म्हटलं की, लहानग्यांपासून मोठ्यांमध्ये एकच जल्लोष आणि उत्साह संचारतो. भाद्रपद महिन्यातील बाप्पाचे १० दिवस सर्वत्र चैतन्य, उत्साह पसरलेला असतो. बाप्पाचे मोहक आणि लक्ष वेधून घेणारं रूपामुळे लहान मुलांचा तो सर्वात लाडका आणि जवळचा असतो. बाप्पा म्हटलं की डोळ्यांसमोर येणरं रूप म्हणजे त्याचे सुपाऐवढे मोठे कान, लांब सोंड, आशीर्वाद देणारा हात आणि डोळ्यांनी सदैव त्याच्या भक्तांवर असणारी कृपादृष्टी असं गजमुख प्रत्येकाच्या डोळ्यात साठवून राहतं. बाप्पाला असं रूप का मिळालं यांची कथा तुम्हाला माहितीच असेल. मात्र देशात असं एक मंदिर आहे. ज्या ठिकाणी मानवी चेहऱ्यातील बाप्पाचे अद्भभुत रूप तुम्हाला पाहायला मिळेल. जाणून घ्या नेमकं कुठे आहे अशा अनोख्या बाप्पाचं मंदिर…

तमिलनाडुच्या कुटनूर येथे असून मंदिराचं नाव आहे ‘आदि विनायक मंदिर’. या गणेश मूर्तीला मानवी चेहरा असल्याने त्याला ‘नर-मुख विनायक’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कुटनूर हे तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे तिरुवरूरपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. तामिळनाडूतील देवी सरस्वतीचे एकमेव मंदिर कुटनूरमध्ये आहे. तिलतर्पण पुरी कुटनूरपासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे. या शहरात एक आदि विनायक मंदिर आहे. येथे पितृ दोषाच्या शांतीसाठी विशेष पूजा केली जाते. येथे भगवान शंकराचे मंदिर देखील आहे.

- Advertisement -

या मंदिराबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की पितरांना शांती मिळावी म्हणून येथे रामाने पूजा केली होती. त्यामुळे हे स्थान पितरांना शांती मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या शहराचे नाव तिलतर्पण पुरी आहे आणि ते पूर्वजांना समर्पित केलेले आहे. दुरून लोक येथे श्राद्ध करण्यासाठी येतात. तिल तर्पण फक्त पूर्वजांसाठी केले जाते. तिलतर्पण पुरी हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, पहिला – तिलतर्पण आणि दुसरा पुरी. तिलतर्पण याचा अर्थ आहे – पूर्वजांना तीळ अर्पण करणे आणि पुरी म्हणजे – शहर, म्हणजेच हे शहर पूर्वजांना समर्पित आहे.


Ganeshotsav 2021 : यंदा बाप्पाला दाखवा पान मोदक ते चॉकलेट फ्युजन…

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -