घरभक्तीउद्या आहे वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त

उद्या आहे वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Subscribe

उद्या (10 जानेवारी) रोजी वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारक चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असते. शिवाय ही संकष्टी वर्षातील पहिली संकष्टी आहे. त्यामुळे संपूर्ण वर्ष सुखकर करण्यासाठी बाप्पाच्या भक्तांना उद्या चांगली संधी आहे. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून दोनदा येते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी साजरी केली जाते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते.

अंगारकी चतुर्थी हे नाव कसं पडलं?
अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधीवत पुजा- अर्चना उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरुप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते. गणेशाच्या या रुपाला ‘संकटमोचन गणेश’ असे म्हटले जाते. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल असे वरदान दिले. त्यादिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.

- Advertisement -

अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
अंगारकी चतुर्थी प्रारंभ 10 जानेवारी दुपारी 12 : 09 पासून
अंगारकी चतुर्थी समाप्त 11 जानेवारी दुपारी 2 : 31 पर्यंत
चंद्रोदयाची वेळ 10 जानेवारी रात्री 9.11 असणार आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजा विधी

- Advertisement -

  • अंगारकी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करावे, गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घ्यावे.
  • यानंतर ‘ॐ गं गणपतये नम:’ मंत्राचा जप करत श्री गणेशाची प्रार्थना करा.
  • एका चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंथरुण त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा, यावर गंगाजल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा, यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा, नंतर लाल रंगांचं फूल, दुर्वा, जान्हवं, पानाचा विडा, लवंग, इलायची आणि गुळ, खोबरं ठेवा.
  • त्यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यावर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची विधीवत पूजा, आरती करा.

अंगारकी चतुर्थीला करा या मंत्राचे आणि श्र्लोकाचे पठण

या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेश स्तोत्राचे पठण करा. तसेच ‘ॐ गं गणपतये नम:’
मंत्राचे पठण करा.

 


हेही वाचा :

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -