Vastu Tips : यंदा श्रावण महिन्यात लावा ‘हे’ झाड; संपूर्ण आयुष्यभर व्हाल मालामाल

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, फळ, सफेद फुलं, धतूरा हे अर्पण करतात.मात्र भगवान शंकरांना बेलाचे पान खूप प्रिय आहे. बेलाच्या पानाशिवाय भगवान शंकरांची अपूर्ण आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. तसेच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, फळ, सफेद फुलं, धतूरा हे अर्पण करतात. मात्र भगवान शंकरांना बेलाचे पान खूप प्रिय आहे. बेलाच्या पानाशिवाय भगवान शंकरांची अपूर्ण आहे.

बेलाच्या पानाला वास्तू शास्त्रामध्ये देखील अत्यंत शुभ मानले जाते. तसेच बेलाचे झाड आपल्या घराच्या आसपास असल्याने घरातील सर्व वास्तू दोष नाहीसे होतात. शिव पुराणानुसार ज्या ठिकाणी बेलाचे झाड असते, ते ठिकाण काशी तीर्थ क्षेत्राप्रमाणे अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच बेलाचे पान सुख-समृद्धी सोबतच अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. तसेच हिंदू धर्म शास्त्रानुसार, जी व्यक्ती श्रावण महिन्यात बेलाचे झाड (रोपटे) लावते. त्या व्यक्तीला भगवान शंकरांचा आर्शिवाद प्राप्त होतो.

श्रावण महिन्यात लावा बेलाचे झाड (रोपटे) 

  • आर्थिक तंगी दूर करण्यासाठी बेलपत्र उपयुक्त असतो, त्यामुळे ज्या ठिकाणी बेलाचे झाड असते तिथे भगवान शंकरांची विशेष कृपा असते, अशा ठिकाणी कधीही कोणते आर्थिक संकट येत नाही, याशिवाय अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील उत्तम राहते.
  • ज्या घराच्या जवळ बेलाचे झाड असते अशा ठिकाणी देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा असते. त्यामुळे त्या घरातील व्यक्तींना गरीबीचा सामना करावा लागत नाही. तसेच अशा घरात देवी अन्नपूर्णेचा सुद्धा सदैव वास असतो.
  • आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बेलाचे पान तिजोरीमध्ये ठेवा.
  • तसेत घरामध्ये बेलाचे लहान रोपटे लावल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होते आणि त्या व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
  • घरामध्ये बेलाचे लहान रोपटे असल्यास घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही.
  • खंरतर बेलाच्या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो, वातावरण पवित्र आणि सकारात्मक करण्यास उपयुक्त ठरते.