Vat Purnima 2022 : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार वट पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास पकडून वडाच्या झाडाची पूजा करतात. यावर्षी हा सण १४ जून रोजी साजरा केला जाईल

मराठी दिनर्दशिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा सण साजरा केला जातो. वट पौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास पकडून वडाच्या झाडाची पूजा करतात. यावर्षी हा सण १४ जून रोजी साजरा केला जाईल.

वट पौर्णिमेचा शुभ मुहूर्त
पौर्णिमा प्रारंभ : १३ जून रोजी रात्री ९ वाजून २ मीनिटांपासून
पौर्णिमा समाप्ती : १४ जून संध्याकाळी ५ वाजून २१ मीनिटांपर्यंत.
मंगळवार , १४ जून रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाईल.

वट पौर्णिमेचे महत्त्व
वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळेच या सणाला वटपौर्णिमा म्हणटले जाते. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दिर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास पकडून वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाला सात फेरे घालून सात जन्म तोच पति मिळावा. अशी मानोकामना देवाकडे मागतात.

वट पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य
१ सूतगंडी,२ खारीक , २ बदाम, १० सुपाऱ्या , २ खोबरे वाटी ,खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप , तूपाचे निरंजन,२५ विड्याची पाने , आंबे, पानवड्यांचा नैवेद्य, यथा शक्ति दक्षिणा, पंचामृत, ताम्हण, कलश, कापूर, फूले-दुर्वा, तूळशीपत्र, पाच फळं.

 


हेही वाचा :http://Hindu Shastra : शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी प्रत्येक शनिवारी करा ‘हे’ उपाय