रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीचं काय झालं? जाणून घ्या पौराणिक कथा

राक्षसांचा राजा रावण खूप विद्वान आणि अहंकारी होता. रावणाला आपल्या शक्तिवर आणि सोन्याच्या लंकेवर खूप गर्व होता. शास्त्रानुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथीला भगवान श्रीराम चंद्रांनी रावणाचा वध केला होता. तेव्हापासूनच हिंदू धर्मात दसरा सण साजरा केला जातो. अनेकजण ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा दहन केला जातो. तसेच या दिवशी रावणासोबतच कुंभकरण आणि मेघनादच्या पुतळ्यांचे देखील दहन केले जाते.

परंतु तुम्हाला ठाऊक आहे का रावणाने एकूण किती लग्न केली होती. वाल्मिक ऋषींच्या रामायणामध्ये रावणाच्या मंदोदरी या पत्नीचाच उल्लेख आढळतो. परंतु खऱ्या आयुष्यात रावणाच्या आणखी दोन पत्नी होत्या. रावणाच्या पहिल्या पत्नीचे नाव मंदोदरी होते. मंदोदरी राक्षसराज मयासुराची मुलगी होती. इंद्रजीत, महोदर, मेघनाद, प्रहस्त, विरूपाक्ष भीकम वीर ही मंदोदरीची मुलं होती. तसेच रावणाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव धन्यमालिनी होते. धन्यमालिनीचे अतिक्या आणि त्रिशिरार हे दोन पुत्र होते. रावणाची आणखी एक पत्नी होती, मात्र तिच्या नावाचा कुठेही उल्लेख आढळत नाही. परंतु प्रहस्था, नरांततका आणि देवताका ही तीन मुलं रावणाच्या तिसऱ्या पत्नीची असल्याचं सांगितलं जातं.

रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीचं काय झालं?
भगवान रामाकडून रावणाचा वध केल्यानंतर बिभीषण लंकेचा राजा झाला. असं म्हणतात की रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणने मंदोदरी सोबत विवाह केला. मंदोदरी बद्दल सांगितलं जात की, ती एक पतिव्रता स्त्री होती. त्यामुळे बिभीषणने दिलेला लग्नाचा प्रस्ताव मंदोदरीने स्विकार केला नाही. मात्र, काही दिवसानंतर मंदोदरीने बिभीषण सोबत लग्न केलं.


हेही वाचा : 

दसऱ्या दिवशी आपट्याची पाने का वाटली जातात? जाणून घ्या