तुळशी विवाहाचा काय आहे शुभ मुहूर्त? जाणून घ्या पूजाविधी

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी देवउठनी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी 4 महिन्याच्या योगनिद्रेतून भगवान विष्णू उठतात. त्यामुळे या एकादशीला देवउठनी एकादशी म्हटलं जातं. तसेच या एकादशीदिवशी तुळशी विवाह देखील साजरा केला जातो. असं म्हणतात की, या दिवशी तुळशी विवाह केल्यास देवी लक्ष्मीचा आर्शिवाद प्राप्त होतो.

तुळशी विवाह शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 5 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे. तुळशी विवाह एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला केला जातो. द्वादशी तिथी 5 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजून 8 मिनिटांपासून ते 6 नोव्हेंबर, संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांपर्यंत असणार आहे.

तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य :
तुळशी विवाहासाठी तुमच्या घरातील तुळस, ऊस, चौरंग किंवा पाट, श्रीकृष्णांचा फोटो किंवा मूर्ती, दोन बाशिंग, अक्षता, दोन फुलांचे हार, हिरवा चुडा, लाल चुनरी, सौभाग्य अलंकार, हळकुंड, आवळा, बोर, पाच फळं, मिठाई, धूप-दीप.

तुळशी विवाह पूजा

तुमच्या घरातील तुळस ज्या ठिकाणी आहे. ती जागा स्वच्छ करा. त्यानंतर तिथे ऊसाचा मंडप तयार करा. एकादशी किंवा द्वादशीच्या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर विवाह सुरु करा. तुळशीभोवती सुंदर रांगोळी काढा. शेजारी पाटावर श्रीकृष्णांची मूर्ती ठेवा. तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करा. त्यांना सजवा. मंगलअष्टका म्हणून दोघांचा विवाह करा. त्यांच्यावर अक्षता टाका. त्यानंतर त्यांना हळकुंड, आवळा, बोर, पाच फळं, मिठाई अर्पण करा. तुळस आणि कृष्णांच्या मंत्राचा जप करा.


हेही वाचा :

रमा एकादशीला करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन; अन्यथा…