घरभक्तीतुळशीच्या विविध प्रकारांचे काय आहे महत्व? जाणून घ्या महत्व

तुळशीच्या विविध प्रकारांचे काय आहे महत्व? जाणून घ्या महत्व

Subscribe

तुळशीच्या रोपट्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला हे ठाऊकच असेल की, तुळशीमध्ये रामा आणि श्यामा हे दोन प्रकार असतात.

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपट्याला अत्यंत पूजनीय मानले जाते. अशी मान्यता आहे की, तुळशीच्या रोपट्याला देवी लक्ष्मी स्वरूप मानले जाते. हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये तुळशीच्या रोपट्याची पूजा केली जाते. वास्तू शास्त्रामध्ये देखील तुळशीच्या रोपट्याला अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपट्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला हे ठाऊकच असेल की, तुळशीमध्ये रामा आणि श्यामा हे दोन प्रकार असतात. परंतु या दोन प्रकारांव्यतिरिक्त अजून दोन तुळशीचे प्रकार आहेत. ज्याला कापूर तुळस आणि वन तुळस देखील म्हटलं जातं.

तुळशीच्या विविध प्रकारांचे काय आहे महत्व?

- Advertisement -
  • रामा तुळस
    वास्तू शास्त्रानुसार, ज्या तुळशीची पाने जास्त प्रमाणात हिरवी असतात. त्या तुळशीला रामा तुळश म्हटलं जातं. या तुळशीला उज्वल आणि भाग्यशाली तुळस देखील मानले जाते. ही तुळस घरामध्ये लावल्यास घरात सुख-समृद्धीचा वास होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते.
  • श्यामा तुळस
    श्यामा तुळशीच्या पानांचा रंग जांभळा असतो. या तुळशीला कृष्ण तुळस देखील म्हटलं जातं. या तुळशीचा उपयोग आयुर्वेदात केला जातो.
  • वन तुळस
    वन तुळशीला मोठ्या प्रमाणात जंगलात सापडते. या तुळशीचा उपयोग आयुर्वेदात केला जातो. या तुळशीची फुलं खूप सुगंधी असतात.
  • कापूर तुळस
    कापूर तुळशीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. याचा वापर अनेक गंभीर आजारांवर केला जातो.

घरामध्ये कोणती तुळस लावावी?
वास्तु शास्त्रानुसार, घरामध्ये रामा आणि श्यामा तुळस लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुळशीला घराच्या पूर्व दिशेमध्ये लावाले. यामुळे घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो.


हेही वाचा :

नवरात्री उत्सवासाठी मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -