Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती काशीच्या देव दीपावलीचा भगवान शंकरांशी काय आहे खास संबंध?

काशीच्या देव दीपावलीचा भगवान शंकरांशी काय आहे खास संबंध?

Subscribe

अश्विन अमावस्येला दिवाळी सण साजरा केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर कार्तिक पौर्णिमेला देशभरातील काही भागांमध्ये देव दीपावली साजरी केली जाते. याचं निमित्ताने कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाराणसीच्या काशीमध्ये देव दीपावलीचा महापर्व साजरा केला जातो. देव दीपावलीला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात. काशीच्या देव दीपावलीचा संबंध भगवान शंकरांशी असल्याचं म्हटलं जातं.

त्रिपुरारी पौर्णिमाला काशीमध्ये असतो दिव्यांच्या झगमगाट
त्रिपुरारी पौर्णिमेला काशीमध्ये तसेच देशभरातील शंकरांच्या मंदिरांमध्ये दिवे लावण्याची प्रथा आहे. काशीमध्ये या दिवशी गंगा घाट, गल्लीत, संपूर्ण शहरात दिव्यांचा प्रकाश करण्याची प्रथा आहे. तसेच संध्या गंगा नदीची भव्य आरती केली जाते.

- Advertisement -

काशीमध्ये का साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा?
यंदा 8 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाईल. हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. धार्मित मान्यतेनुसार, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी-देवता काशीमध्ये येतात आणि गंगा नदीमध्ये स्नान करुन दीपोत्सवाचा भाग बनतात.

असं म्हणतात की, या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे सर्व मनुष्य आणि देवी-देवता आनंदी झाले. सर्वांना त्रिपुरासुराच्या त्रासापासून मुक्ति मिळाली. त्यामुळे भगवान शंकरांना खूश करण्यासाठी या दिवशी सर्व देवी-देवतांनी काशीमध्ये जाऊन दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमेला काशीमध्ये देव दिवाळी साजरी केली जाते.


- Advertisement -

हेही वाचा :

तुळशी विवाहाचा काय आहे शुभ मुहूर्त? जाणून घ्या पूजाविधी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -