दसऱ्या दिवशी आपट्याची पाने का वाटली जातात? जाणून घ्या

दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्व असतं. घरोघरी आपट्याच्या पानांची पूजा केली जाते आणि एकमेकांना पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.

यावर्षी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वत्र दसरा सहारा करण्यात येणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवसाचे महत्व आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांची पूजा याच दिवशी संपन्न होते. अशातच दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्व असतं. घरोघरी आपट्याच्या पानांची पूजा केली जाते आणि एकमेकांना पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. पण दसऱ्याच्या दिवशी आपट्याचीच पाने का वाटली जातात या संदर्भांत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

रघकुलातील श्रीराम चंद्रांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती. पण ती त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्विकारला. हे राजे अरण्यात राहत असताना त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी इथे आले. त्यांनी त्या राजांकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली होती. वास्तविक ते राजे तेव्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले तेव्हा त्यांच्याकडे धन नव्हते. तरीही गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले.

पण त्या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत अशी मागणी इंद्रदेवांकडे केली. तेव्हा इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या, असे इंद्रदेवांनी सांगितले. त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयदशमीला सोने म्हणून लुटतो. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. अशी अख्यायिका सांगितली जाते असं तज्ञ म्हणतात.


हे ही वाचा –  यावर्षी दसऱ्याला आहेत ‘हे’ तीन विशेष मुहूर्त