घरभक्तीआषाढ अमावस्येला का केले जाते दीपपूजन? गरूड पुराणानुसार काय आहे महत्व

आषाढ अमावस्येला का केले जाते दीपपूजन? गरूड पुराणानुसार काय आहे महत्व

Subscribe

गरूड पुराणानुसार, प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्व सांगण्यात आले आहे, त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप पूजन करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे

हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरूवात होते. भारतीय संस्कृतीत आषाढ महिन्याच्या दीप अमावस्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. यामुळेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी करण्यात येते.

काय आहे दीप अवस्याचे महत्व :

- Advertisement -
  • गरूड पुराणानुसार, प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्व सांगण्यात आले आहे, त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप पूजन करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे.
  • अनेक लोकं या पवित्र दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांच्या नावाने दान सुद्धा केले जाते.
  • या दीप पू़जनात घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे बनवण्याचे सुद्धा महत्व सांगितले जाते. या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पुर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते. या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रह दोष देखील शांत होतो.

याप्रकारे करा दीपपूजन :

  • महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे,निरांजन,समई,लामण स्वच्छ करुण ठेवावे. तसेच सर्व दिवे पाटावर मांडून त्यांची पूजा करावी. पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्याची सजावट करावी.
  • सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दिप प्रज्वलित करावे. अशा प्रकारे आषाढी दीप अमवस्या साजरी करण्यात येते. तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते.
  • हळद,कूंकू,अक्षता,फूले वाहून दिव्यांची पूजा केली जाते.तर अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करुन नैवैद्य दाखवतात व सांयकाळी सर्व दिव्यांची आरती करण्याता येते.
  • शुभंकरोती ही प्रर्थना करुन लहान मुलांना सांयकाळी ओवाळलं जात. लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते.

हेही वाचा :Hindu Shastra : श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -