जाणून घ्या! वट पौर्णिमेदिवशी महिला वडाला सूत का गुंडाळतात?

वटवृक्ष हा शिवरूपी आहे. आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावे याकरता महिला वडाला सूत का गुंडाळतात हे जाणून घेऊया.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वट पौर्णिमेचा उत्साह आहे. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला येणार सण म्हणजे वट पौर्णिमा. नवऱ्याला दिर्घायुष्य लाभावे याकरता महिला हे व्रत आणि पूजा करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वट वृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो. (Why do women wrap yarn on banyan tree?)

आणखी वाचा – Nirjala Ekadashi 2022 : निर्जला एकादशीच्या दिवशी ‘या’ 3 उपायांनी चमकेल तुमचे भाग्य

वटवृक्षाला सूत का गुंडाळतात?

वटवृक्ष हे शिवाचे रुप आहे. वटवृक्ष हा दिर्घकाळ जगणारा वृक्ष असून या वृक्षापासून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतं. या वृक्षांवर पक्षांचा वावर असतो. तसेच, अनेक पक्षी घरटी करून आपला संसार थाटतात. पतीला दिर्घायुष्य मिळावं आणि स्थिरतेचं प्रतिक म्हणून वडाला पुजले जाते. सावित्रीने सत्यवानाचे पार्थिव वडाखालीच ठेवले होते. यामागे वडाप्रमाणेच त्याला दिर्घायुष्य लागो अशी सावित्रीची धारणा होती, अशी आख्यायिका आहे. वड समृद्धीचं प्रतिक आहे. यामुळेच वडाला सूत गुंडाळून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली जाते.

हेही वाचा – वट सावित्रीचे व्रत करताना ‘या’ गोष्टी टाळा

तसेच, वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी आकृष्ट करून वायुमंडळात प्रक्षेपित करत असतात. वटवृक्षाच्या खोडाला ज्यावेळी सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

झाड्याच्या फांद्या तोडून रूढी जपू नका

आजही आपल्या रूढी – परंपरा जपत, थोरा-मोठ्यांना आवडतं म्हणून किंवा एरव्ही जीन्स आणि शर्टमध्ये वावरणाऱ्या महिला वटपौर्णिमेला मात्र सर्व साजश्रृंगार करून वडाला फेऱ्या मारताना दिसतात. त्यांचं कौतुक आहेच. कारण त्या पर्यावरणाला कोणताही हानी न पोचवता आपली परंपरा जपण्याचा, कोणालाही न दुखवता उपास – तापास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ज्या महिला झाडांच्या फांद्या आणून पूजा करतात किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन वाण म्हणून मात्र पानाचा वापर करतात, त्यांचं काय? मुळात आधुनिक युगात व्रत ही कदाचित विसंगती आहे. झाडांच्या फांद्या तोडून उपास करण्यानं नक्की काय होतं? आजच्या मुली दिवसभर धावपळीत कामावर जातात. फक्त फळं खाऊन उपवास करणं शक्य असतं का? मग पर्याय निघतो उपवासाचे पदार्थ खाण्याचा. मग इतकं सगळं ओढाताण करून का करायचं असाही प्रश्न पडतो. वटपौर्णिमा हा एक सण आहे आणि तो रूढी – परंपरा जपत पूजा करून एकमेकींना भेटून खेळून – मिसळून घालवला तर चालणार नाही का? रूढी – परंपरा आधुनिक पद्धतीनंदेखील जपता येतात. त्यासाठी पर्यावरणाला हानी पोहचवण्याची खरंच गरज आहे का आणि त्यानं नक्की काय साध्य होत असतं? तुमचा पती तुमच्यासाठी हे व्रत करतो का? तो तुमच्याप्रमाणेच तुम्हाला जपत असेल आणि तुमच्या बरोबरीनं हे व्रत करत असेल तर नक्कीच ते कौतुकास्पद आहे. पण तरीही सात जन्म खरंच हा पती मिळणार असतो का? हा प्रश्न तर तसाच राहतो.