हिंदू धर्मात प्रत्येक धर्माबाबत विविध मान्यता आहेत. प्रत्येक महिन्याचे एक विशिष्ट महत्त्व आहे. अशातच आता पौष महिना सुरु झाला आहे. या हिंदू महिन्यातील दहावा महिना आहे. 24 डिसेंबर 2022 पासून पौष महिना सुरु झाला असून हा 22 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. पुरातन काळापासून पौष महिन्यामध्ये कोणेतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य आहे. तसेच या महिन्याचे काही नियम, उपाय देखील सांगितले जातात.
पौष महिन्यात कोणते कार्य करु नये?
पौष महिन्यामध्ये अनेक कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. मुख्य म्हणजे मांगलिक कार्य आणि शुभ काम या महिन्यात करु नये. लग्न, साखरपुडा, पूजा, गृहप्रवेश, खरेदी अशी विविध कामं या महिन्यात करु नये.
पौष महिन्यात शुभ कार्य का करु नये?
ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह धनू राशीचा स्वामी असतो. जेव्हा गुरु आपल्याच राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते शुभ मानलं जात नाही. असं झाल्यास कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होतो. या राशीमध्ये सूर्य मलीन झाल्याने त्याला मलमास देखील म्हटलं जातं. त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते.
पौष महिन्यात करा ‘हे’ उपाय
- शास्त्रानुसार, पौष महिन्यात सूर्य देवाची पूजा करण्याचे महत्व सांगितले जाते.
- या दिवसात सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच त्यांच्या मंत्रांचे पठण करावे.
- या महिन्यात श्री विष्णूंची पूजा आराधना करण्याचे देखील महत्त्व सांगितले जाते.
- या महिन्यात गरजू लोकांना उबदार कपडे, गूळ, तीळ यांचे दान करा.
- पौष महिन्यात पितरांसाठी पिंडदान, तर्पण करणं शुभ मानलं जातं.
हेही वाचा :