यंदाची गणेश जयंती का आहे खास? ‘या’ उपायांनी पूर्ण करा सर्व मनोकामना

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात की, जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. यंदा 25 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. तसेच या दिवशी बुधवार असल्याने गणेश जयंतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी काही खास उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल.

गणेश जयंती तिथी

Ganesh Chaturthi 2019: गणपतीची लांब सोंड, मोठ पोट, बारीक डोळे असं गणेशाचं  रूप जाणून घ्या नेमकं कशाचं प्रतिक आहे? या आहे त्यामागील अध्यात्मिक संकेत ...माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 24 जानेवारी, मंगळवारी दुपारी 3:22 पासून सुरु होणार असून 25 जानेवारी, बुधवार दुपारी 12: 34 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, 25 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल.

शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, 25 जानेवारी रोजी शुभ मुहूर्त सकाळी 11:29 पासून दुपारी 12:34 पर्यंत असेल.

माघी गणेश जयंतीला करा ‘हे’ उपाय

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी पर करनी है गणपति स्थापना तो इन नियमों  का करें पालन - rule of establishes the statue of lord ganesha on ganesh  chaturthi 2022 – News18 हिंदी

  • यंदा बुधवारी गणेश जयंती असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल त्यांसाठी हा खास दिवस आहे.
  • कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असल्यास गणेश जयंतीला श्री गणेशांच्या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा करुन पूजा करा.
  • या दिवशी गरिब आणि गरजू व्यक्तीला हिरव्या रंगाचे वस्त्र किंवा वस्तू दान करा.
  • या दिवशी पक्षांना हिरवे मूग खाऊ घाला.
  • या दिवशी गणेश मंदिरात जाऊन 21 दुर्वा अर्पण करा आणि गणेश मंत्राचे पठण करा.

‘या’ दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याचे महत्त्व
अग्नि पुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात.


हेही वाचा :

माघी गणेश जयंतीला असणार ‘हे’ 3 शुभ योग; जाणून घ्या मुहूर्त