घरभक्तीवसंत पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पौराणिक...

वसंत पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पौराणिक कथा

Subscribe

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रामुख्याने हा सण विद्यार्थी, कला, संगीत या क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती देवीची पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात, या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ति बुद्धिमान आणि एकाग्र होतो.

यंदा 26 जानेवारीला साजरी केली जाणार वसंत पंचमी
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी 25 जानेवारी दुपारी 12:33 पासून सुरु होणार असून ती 26 जानेवारी 10:37 पर्यंत असेल.

- Advertisement -

वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्यासाठी 26 जानेवारी सकाळी 7:06 पासून 12:34 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.
तसेच यावर्षी वसंत पंचमीला 4 शुभ योग असतील. या योगांमध्ये सरस्वती पूजन करणं शुभ मानलं जाईल.

शिव योग – सकाळी 7:06 पासून दुपारी 3:29 पर्यंत
सिद्ध योग – सकाळी 7:06 पासून संध्याकाळ पर्यंत असेल.
सर्वार्थ सिद्धि योग – संध्याकाळी 6: 57 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7:12 पर्यंत
रवि योग – संध्याकाळी 6: 57 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7:12 पर्यंत

- Advertisement -

वसंत पंचमी पौराणिक कथा

वसंत पंचमीची कथा महाकवि कालिदास यांच्याशी जोडलेली आहे. पौराणिक कथेनुसार, कालिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली त्यावेळी ते खूप दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते आत्महत्या करण्यार त्या पूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची रचना केली.

वसंत पंचमीशी जोडलेल्या आणखी एका कथेनुसार, वसंत पंचमीशीच्या दिवशी देवी सरस्वती पृथ्वीवर प्रकट झाल्या तेव्हा संपूर्ण सृष्टीला वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती झाली.


हेही वाचा :

नाशिक-त्र्यंबक मार्ग दिंडयांनी फुलला; निवृत्तींनाथ महाराज यात्रेनिमित्त लाखो वारकर्‍यांचा मेळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -