घरभक्तीMagh Purnima 2022 : माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजा का करावी?

Magh Purnima 2022 : माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजा का करावी?

Subscribe

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला माघ पौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात कार्तिक आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेला गंगा स्नान केले जाते. या दिवशी गंगा काठी मोठा उत्सव आयोजित केला जातो. भाविक तिथे जाऊन पूजा, जप, तप आणि दान करतात. पौर्णिमेच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, माघ पौर्णिमेच्या दिवशी पूजा, आराधना आणि दान केल्यास आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते.

माघ पौर्णिमा तिथी

यंदा रविवार 5 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाईल.
माघ पौर्णिमा प्रारंभ : 4 फेब्रुवारी रात्री 9:29 पासून
माघ पौर्णिमा समाप्ती : 5 फेब्रुवारी रात्री 11:58 पर्यंत

- Advertisement -

माघ पौर्णिमा पूजा विधी

ArtStation - Lord Vishnu | The Protector

  • माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही नदीमध्ये स्नान करा. जवळपास नदी नसल्यास घरीच पाण्यात गंगा जल टाकून स्नान करा.
  • त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
  • त्यानंतर घरातील देवी-देवतांची पूजा करा.
  • गरीब, गरजू लोकांना दान द्या.
  • या दिवशी शक्य असल्यास घरामध्ये श्री सत्य नारायणाची पूजा करा. कथेचे वाचन करा.
  • तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण मंत्राचा जप करा.

माघ पौर्णिमा करा ‘या’ वस्तूंचे दान

पद्म पुराणानुसार, माघ पौर्णिमेला गंगा-यमुना यांसारख्या नदीमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी गुळ, तीळ आणि चादर दान करणं शुभ मानलं जातं. शिवाय वस्त्र, तूप, लाडू, फळ, अन्न देखील तुम्ही दान करु शकता.

- Advertisement -

हेही वाचा :

Magh Purnima 2022 : माघ पौर्णिमेचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या खास संयोग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -