Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर सणवार HOLI 2021: होळीसह रंगपंचमी सणाची जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

HOLI 2021: होळीसह रंगपंचमी सणाची जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Related Story

- Advertisement -

देशात होळी साजरी करण्याची पद्धत वेग-वेगळी असून या होळी सणात वैविध्यपूर्ण दिसून येते. देशात रविवारी २८ मार्च रोजी होळी हा सण साजरी केली जाणार आहे. यासह दुसऱ्या दिवशी २९ मार्च रोजी धुलीवंदन साजरी केली जाणार आहे. होळी, धुलीवंदन या दोन्ही दिवसाला रंगांचा सण म्हणून ओळखले जाते. यंदा देशात कोरोनाचा कहर सुरू असल्याने सर्वच ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध देण्यात आले आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का होलिका दहनसह होळी आणि रंगपंचमीची काही वैशिष्ट्ये.

जाणून घ्या महाराष्ट्रात कशाप्रकारे होळी साजरी केली जाते

- Advertisement -

अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी घरासमोरील आंगण शेणाने सारवून स्वच्छ केले जाते. अंगणाच्या मधोमध गोलाकार रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोऱ्या झाडाच्या फांद्या रचून त्याला आग लावून होळी केली जाते. यावेळी या होळीची पूजा केली जात असून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.महाराष्ट्रात गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवला जाते. यामुळे महाराष्ट्रात पुरणपोळीला होळीच्या दिवशी विशेष मान दिला जातो. ही पूजा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर होळीच्या दिवशी मोठ्याने बोंब ठोकली जाते. नंतर खणा-नारळाने ओटी देखील भरली जाते. होळीच्या दिवशी समिधा म्हणून त्यात लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवास सुरूवात होते. तर दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या लोंब्या भाजण्याची प्रथा आहे. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे.

रंगपंचमी सणाची जाणून घ्या खास वैशिष्ट्यं

- Advertisement -

फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. रंगपंचमी हा सण होळी, धुलिवंदन, रंगोत्सव, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावांनी साजरा केला जातो. काही ठिकाणी होळीनंतरचा दुसरा दिवस रंगपंचमी साजरी होते तर काही ठिकाणी होळीनंतरचे पाच दिवस धुळवडीचा आनंद लुटला जातो. या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवास सुरूवात होत असून या दिवसापासून झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते. त्यामुळे निसर्गातही रंगाची उधळण सुरू असते. याचं एक प्रतिक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी. शिवाय या काळात उन्हाची काहिली वाढू लागते. त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.


- Advertisement -