घरगणपती उत्सव बातम्याजाणून घ्या कधी येणार माहेरवाशीण?

जाणून घ्या कधी येणार माहेरवाशीण?

Subscribe

गणपती बाप्पाचे आगमन झाले की, त्या पाठोपाठ गौराईचे आगमन होते. पण, यंदा गौरींचं आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय आहे ते जाणून घ्या. तसेच प्रत्येकाच्या पट्ट्यानुसार गौरीचे पूजन देखील केले जाते. त्याचप्रमाणे गौरी मांडण्याच्या देखील विविध पद्धती असतात. त्याप्रमाणे गौराई पुजली जाते. परंतु, गौरी मांडण्याच्या कोणत्या विविध पद्धती आहे. ते आज आपण पाहणार आहोत.

जाणून घ्या कधी येणार माहेरवाशीण?

यावर्षी येत्या २५ ऑगस्टला गौरींचं महालक्ष्मींचं आगमन होणार आहे. तर २६ तारखेला पूजन असेल आणि २६ ऑगस्टला गौरींना निरोप दिला जाईल. दुपारी १ वाजून ५८ मिनीटांनंतर गौरींच्या आगमनाचा शुभ मुहूर्त आहे. तर प्रत्येकाच्या घरातील कुळाचाराप्रमाणे गौरी पूजन केलं जातं. तर गौरींच्या विसर्जनाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ३६ मिनीटांनंतर आहे.

- Advertisement -

गौरी मांडण्याच्या ‘या’ आहेत विविध पद्धती

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतात गौरी पूजनाची वेगवेगळी पद्धत बघितली जाते. काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात, तर काही कुटुंबांमध्ये पाणवठ्यावर जावून पाच, सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. त्याला खड्यांच्या गौरी असे देखील म्हणतात. तर काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी-चोळी नेसवून त्याची पूजा केली जाते.

त्याप्रमाणे काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील गहू, तांदूळ याच्या राशी मांडून त्याची पूजा करतात. तर विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी सिमेंट, लोखंडी किंवा मातीच्या कोथळ्यांवर धड बसवून त्यावर महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. तसेच एका कोथळी खाली गहू आणि दुसऱ्या कोथळीखाली तांदूळ ठेवले जातात. त्याप्रमाणे विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात. याशिवाय कुठे तेरड्याची गौर असते. यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मुळं म्हणजेच गौरींची पावलं असं म्हटलं जातं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -