हेमलता राहुल शिंपी यांच्या घरातील बाप्पाची मूर्ती लालबागच्या राजाची प्रतिकृती साकारलेली आहे. यंदा शिंपी कुटुंबीयांनी चांद्रयान – 3चा देखावा साकारला आहे. इस्रोने चांद्रयान – 3 मोहिम यशस्वी झाली. भारताने दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश झाला आहे. भारताच्या यशानंतर शिंपी कुटुंबीयांनी त्यांच्या बाप्पाचा देखावा चांद्रयान – 3वर देखावा साकारला आहे. या देखाव्यासाठी शिंपी कुटुंबीयांनी एल व्ही एम 3 रॉकेट लॉंचर , विक्रम लॅण्डर, प्रज्ञान रोव्हर व चंद्र आदींच्या उभेहूब प्रतिकृती साकारली आहेत. चांद्रयान- 3 प्रतिकृती साकारण्यासाठी पुटा, कापूस, रंगीत कागद इत्यादीचा वापर केला आहे.