घर गणेशोत्सव 2023 मंगलमूर्ती श्री गणराया... मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, बाप्पाचे जल्लोषात स्वागत

मंगलमूर्ती श्री गणराया… मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, बाप्पाचे जल्लोषात स्वागत

Subscribe

मुंबई : ज्या क्षणाची अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता, तो दिवस अखेर आज, मंगळवारी आला आहे. घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळात सर्वांचा लाडका बाप्पा विराजमान होत आहेत. गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने वातावरण आल्हाददायक बनले आहे.

हेही वाचा – Photo : मुंबईतील ‘या’ गणपती मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची होते गर्दी

- Advertisement -

महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह राज्यभरात पाहाला मिळत आहे. मुंबई, पुणे, कोकणासह राज्यभरात गणरायाचे आगमन होत आहे. आज बाप्पाची वाजतगाजत स्वागत मिरवणूक काढण्यात येत आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिवपती असलेल्या गणरायाच्या स्वागताची अनेक ठिकाणी काल, सोमवारी उशिरापर्यंत तयारी सुरू होती. तर, मोठमोठ्या मंडळांमध्ये आठ-दहा दिवस आधी श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. आज, मंगळवारी गणपतीची मनोभावे प्रतिष्ठापना केली जाईल. त्याला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविला जाईल. त्यामुळे घरातील वातावारण पूर्णपणे चैतन्यमय राहील.

गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रासोबतच जगभरात साजरा केला जातो. मुंबईतील गणेशोत्सव हा तर विशेष आकर्षणाचा सोहळा मानला जातो. जागोजागी सार्वजनिक गणेश मंडळ बाप्पाची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाची मनोभावे सेवा केली जाणार आहे. हे सर्व दिवस भारावलेले असतात. गणेशभक्त गणरायाच्या दर्शनासाठी आप्तांकडे जातातच, शिवाय विविध सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी लांब रांगामध्येही उभे राहतात. या गणेशोत्सवात गणरायाची नानाविध विलोभनीय रूपे पाहून मन प्रसन्न होते.

- Advertisement -

हेही वाचा – गणपतीची पाच मुख्य नावे आणि त्याचा अर्थ

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला
मुंबईसह कोकणातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कोकणात घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. याकरिता चाकरमानी मुंबईहून खास गणेशोत्सवासाठी कोकणात जातो. यंदाही मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. तिथे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. बाप्पाच्या दर्शनाची आस असलेल्या गणेश भक्तांनी दुप्पट वेळेचा प्रवास करून कोकण गाठले आणि आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणले.

कोकणात सध्या गणरायाच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाला गऱ्हाणे घालून कोकणात गणपती उत्सवाला सुरुवात होते. पारंपरिक संस्कृती म्हणून कोकणातील गणेशोत्सवाला ओळखले जाते. त्यामुळे कोकणातील गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वेगळेपण पाहायला मिळते. वाजतगाजत घरी गणपती बाप्पांची सुबक, रेखीव गणेशमूर्ती विराजमान केली जात आहे. मुंबईचा चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाचा आनंद घेत आहे.

- Advertisment -