Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2023 विशेष लेख आधी वंदू तुज मोरया... गणरायाच्या प्रतिष्ठापनेची सज्जता आणि शास्त्र

आधी वंदू तुज मोरया… गणरायाच्या प्रतिष्ठापनेची सज्जता आणि शास्त्र

Subscribe

शिवानी पाटील : घरोघरी अन् सार्वजनिक मंडपात गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबई, पुणे परिसरात जागोजागी मंडप उभारण्यात आले आहेत. आज ‘बाप्पा’चे आगमन होणार आहे.

जमला हा जयघोष कराया मेळा बाळा-गोपाळांचा
पार्वतीनंदन गजवदनाचा, मंगल बाप्पा मोरयाचा
एक मुखाने एक सुराने घोष चालतो मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया रे बाप्पा मोरया रे

- Advertisement -

हे स्वर आता कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळतील. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाईल. संपूर्ण राज्यभरात पुढील 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असेल.

हेही वाचा – गुणेश तू गणेश तू… बाप्पासाठी पर्यावरणस्नेही मखर अन् आरास

- Advertisement -

प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असतं. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, प्रत्येक ठिकाणी गणरायाचे स्वरुप, पूजाअर्चेची पद्धती काही प्रमाणात वेगवेगळ्या आढळतात.

अशी असावी मूर्ती

वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणण्याआधी गणेश मूर्ती कशी असावी याला महत्त्व आहे. गणेशमूर्ती ललितासनमध्ये बसलेला सर्वात शुभ मानले जाते. कारण ही मुद्रा शांत आणि शांतीचे प्रतिनिधित्व करते. याशिवाय आराम करत असलेल्या स्वरुपातील गणपतीची मूर्ती धनाचे प्रतीनिधित्व करते. तसेच गणपतीची सोंड डाव्या दिशेला असावी. गणपतीच्या हातात मोदक असायला हवा तसेच गणपतीच्या बाजूला उंदीर देखील असायला हवा.

हेही वाचा – जीवाला तुझी आस गा लागली… बंधन दूर होताच गणेशमूर्तीने घेतले विराट रूप

गणेश मूर्ती कोणत्या दिशेला हवी?

घरामध्ये गणेशमूर्तीची स्थापना करण्यापूर्वी योग्य दिशेची विशेष काळजी घ्यायला हवी. वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवण्याआधी योग्य वेळ आणि योग्य दिशा पाहायला हवी. वास्तूशास्त्रानुसार, गणपती बाप्पा घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते. परंतु ईशान्य दिशेला शक्य नसल्यास तुम्ही गणेशमूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला देखील ठेऊ शकता.

या ठिकाणी ठेऊ नये गणेशमूर्ती

घराच्या दक्षिण दिशेला कधीही गणेशमूर्तीची ठेऊ नका. तसेच घरातील शौचालयाजवळ, स्टोअररूमजवळ तसेच पायऱ्यांखाली कधीही गणेश मूर्तीची स्थापना करू नये.

हेही वाचा – ब्रह्मा धरीतो तालही रंगून… ‘ढोल कुणाचा वाजतो?’ पुणेरी ढोल-ताशा पथकात चढाओढ

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी…

सर्वप्रथम एक पाट किंवा चौरंग साफ करून त्यावर गंगाजल शिंपडून तो शुद्ध केला जातो. त्यानंतर त्यावर लाल वस्त्र अंथरून अक्षता ठेवल्या जातात. या पाटावर किंवा चौरंगावर गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. परंतु मूर्ती स्थापन करताना मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी-सिद्धी म्हणून एक-एक सुपारी ठेवली जाते. गणपतीच्या उजव्या बाजूस पाण्याचा एक कलश भरून ठेवला जातो. त्यानंतर हातामध्ये अक्षता आणि फुले घेऊन मनात बाप्पाचे ध्यान करून ॐ गं गणपतये नम: या मंत्राचा जप करावा, असे शास्त्रात म्हटले आहे.

बाप्पाला कधीही अर्पण करू नका ‘या’ गोष्टी

गणपतीची विधीवत पूजा-आराधना केली जाते. बाप्पाला वेगवेगळी फुले देखील अर्पण केली जातात. मात्र, कधी कधी कळत-नकळत बाप्पाच्या पूजेत आपल्याकडून एखादी चूक होऊ शकते. बाप्पाला लाल जास्वंदीचे फूल आवडते हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, काही फुले अशी देखील आहेत जी बाप्पाला आवडत नाहीत, असे मानले जाते महादेवांना केतकीचे फूल आवडत नसल्याने बाप्पाला देखील ते फूल आवडत नाही. त्यामुळे बाप्पाच्या पूजेमध्ये केतकीच्या फुलाचा वापर करू नये, असे म्हणतात.
बाप्पाला तुळशीचे पान देखील आवडत नाही, असेही मानले जाते. पौराणिक कथेनुसार, एके दिवशी तुळशीने गणपतीला तिच्यासोबत विवाह करण्याची मागणी केली होती. तेव्हा गणपतीने तुळशीला शाप दिला होता. त्यामुळे बाप्पाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही, अशी आख्यायिका आहे. पूजेमध्ये सुकलेल्या फुलांचा देखील कधीही वापर केला जात नाही. सुकलेल्या फुलांमुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते.

हेही वाचा – विघ्‍नविनाशक गणेशदेवा… लाडक्या बाप्पाच्या आवडत्या मोदकांची 10 दिवस रेलचेल

गणेश चतुर्थी तिथी

चतुर्थी तिथी समाप्त : 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01:43 पर्यंत असेल.
19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.
पूजेचा शुभ मुहूर्त : सकाळी 11:19 ते दुपारी 01:43 असेल.

- Advertisment -