Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2023 विशेष लेख जीवाला तुझी आस गा लागली... बंधन दूर होताच गणेशमूर्तीने घेतले विराट रूप

जीवाला तुझी आस गा लागली… बंधन दूर होताच गणेशमूर्तीने घेतले विराट रूप

Subscribe

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा गणेशोत्सव (Mumbai Ganeshotsav) 19 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने सजू लागली आहेत. आपल्या आवडीची मूर्ती बुक करण्यासाठी भक्तांचीही लगबग सुरू झाली आहे.

मुंबई : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा गणेशोत्सव (Mumbai Ganeshotsav) 19 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने सजू लागली आहेत. आपल्या आवडीची मूर्ती बुक करण्यासाठी भक्तांचीही लगबग सुरू झाली आहे. पण शहरातील मूर्ती विक्रेत्यांमध्ये ‘पीओपी’च्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या पाहता शाडूच्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या अगदीच कमी आहे. (Ganeshotsav 2023 Ganesh Idol Height Iimit Price Mumbai Ganpati Bappa)

सजावटीसाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडपात गणरायाची मूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण यावर्षी कोणत्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा होणार आहे. तसेच यावेळी गणेश मूर्तींच्या उंचीवरही कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे आता विविध गणेश मंडळांमध्ये उंच मूर्तींची स्पर्धा पुन्हा पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीच्या हमीपत्रात चार फूट उंची आणि पर्यावरणपूरक मूर्तीची अट हटविण्यात आली आहे. यामुळे मंडळांना यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा विविध आकाराच्या गणेशमूर्तीं पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा म्हटले की, सिंहासन किंवा पाटावर बसलेली पारंपरिक मूर्ती आपल्या नजरेसमोर येते. पण यंदा मात्र मूर्तीला थोडासा हटके लूक देण्याचा प्रयत्न मूर्तीकारांनी केला आहे.

मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ

- Advertisement -

उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे सर्व गणेशभक्तांमध्ये गणेश मूर्तीच्या उंचीसह त्यांच्या किमतीची चर्चा सुरू आहे. कारण सार्वजनिक गणेशमूर्तीच्या कारखान्यांमध्ये 4 फूटांपासून 25 ते 30 फूट उंच गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत. तसेच, या उंच मूर्तींची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे.

सामग्री महागली

गणेश मूर्तीची उंची आणि किमतींबाबत मूर्तीकारांशी संवाद साधला असता त्यांनी गणेशमूर्तीच्या किमती वाढल्याचे सांगितले. महागाईचा परिणाम मूर्तीच्या किमती वाढण्यावर झाला आहे. वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीचे दर वाढले आहेत. तसेच, कारखान्यांच्या जागेच्या भाड्यातही वाढ झाली असून कारखान्यात काम करणाऱ्या कारागिरांच्या मोबदल्यातही वाढ करण्यात आली आहे. परिणामी वाढलेल्या या खर्चामुळे गणेश मूर्तीच्या किमतीही वाढल्याचे सांगितले.

कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीमुळे प्रदूषण आणि निसर्गाची होत असलेली हानी लक्षात घेत यंदा ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी विविध कारखान्यांमध्ये कागदी लगद्याच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी 1 ते 3 फूटांपर्यंत कागदी लगद्यापासून गणेश मूर्ती बनवण्यात आल्या असून त्यांची किंमत 5 ते 10 हजार इतकी आहे. तसेच, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी बनवण्यात आलेल्या गणेशमूर्तीची किंमत 40 हजारांपासून सुरू आहे.

घरगुती गणपती बाप्पांना फायबरची प्रभावळ

घरगुती गणेश मूर्तीला फायबरची प्रभावळ लावली जात आहे. तसेच ही प्रभावळ सहज काढताही येते. त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा या प्रभावळीचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे पीओपीपेक्षा फायबरच्या प्रभावळीवर कोरीव काम करणे अधिक सोपे जाते. कार्यशाळेतील 2 ते 3 फूटांच्या गणेशमूर्तीची किंमत 6 हजारापासून 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत आहे. मूर्तीकार घरगुती गणेशमूर्ती साधारणत: पीओपी आणि शाडू मातीचे बनवतात. मात्र, या मूर्तींच्या प्रभावळीचे वजन जास्त असल्यामुळे मूर्ती घरी आणतेवेळी आणि विसर्जनावेळी उचलणे खूपच जड जात असे.


हेही वाचा – Ganpati Festival-2023 : 156 गणपती स्पेशल ट्रेनचे बुकींग मंगळवारपासून

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -