घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: आमची मुंबई पुन्हा धावू दे रे गणराया...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: आमची मुंबई पुन्हा धावू दे रे गणराया…

Subscribe

स्वप्नांच शहर…देशाची आर्थिक राजधानी…घड्याळाच्या काट्याना वाट दाखवणारी…क्रिकेट, चित्रपट, गायक, कलावंत, उद्योगधंदे या सर्वांचे माहेरघर असणारी…वडापाव असू दे कि मारिन ड्राईव्हचा पाऊस…आणि तिचा श्वास म्हणजे तिची लाईफलाइन लोकल ट्रेन…अशी सर्वाना हवीहवीशी वाटणारी, सुरक्षित असणारी मायानगरी म्हणजेच ‘मुंबई’. अशा मुंबईचा देखावा साकारला आहे, बोरिवली येथे राहणाऱ्या प्रतीक जयंत प्रधान यांनी. त्यांचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे.

- Advertisement -

अशी करण्यात आली सजावट

गणपतीची मूर्ती ही शाडू मातीची असून बाप्पाची संपूर्ण सजावट ही पूर्ण कापड, पुठे, कागद आणि वॉटर कलर पेंटींगने करण्यात आली आहे.

मुंबई नेहमी आनंदी आणि सर्वाना आपलस करून घेणारी. जणू काही आईच्या मायेसारखी. मुंबई आजवर अनेक छोट्या-मोठ्या संकटांचा सामना करीतच आली आहे. परंतु, या संकटातून सावरून पुन्हा उभे रहाणे हेच तर मुंबईनी सर्वांना शिकवले असून हेच मुंबईचे स्पिरिट आहे.

- Advertisement -

मग त्यात १२ मार्च १९९३चा बॉम्बमब्लास्ट असू दे किंवा २६ जुलै २००५मचा महापूर असू दे. ११ जुलै २००६चा मुंबई लोकल ट्रेन मधील बॉम्ब ब्लास्ट असो किंवा २६ नोव्हेंबर २००८चा दहशतवादी हल्ला असू दे. त्यानंतर मुंबई कधीच थांबली नाही. परंतु, काही महिन्यांपूर्वी या जगावर कोरोना नामक विषाणूंचा हल्ला झाला. त्यामुळे कधीही न थकलेली मुंबई थांबली आहे. तसेच अजूनही ती शांतच आहे. मुंबईचे असे रूप कोणालाच बघवत नाही. त्यामुळे ‘आमची मुंबई पुन्हा धावू दे रे गणराया…’अशी हाक या देखाव्यातून दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -