Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Religious 3 दिवसानंतर बुधादित्य राजयोगाने 'या' राशींचे उजळणार भाग्य

3 दिवसानंतर बुधादित्य राजयोगाने ‘या’ राशींचे उजळणार भाग्य

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, 7 जून रोजी बुध ग्रह राशीपरिवर्तन करून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर सूर्य आधीच वृषभ राशीत आहे. यामुळे वृषभ राशीमध्ये सूर्य आणि बुधाचा संयोग होऊन बुधादित्य राजयोग निर्माण होईल. 15 जूनपर्यंत सूर्य वृषभ राशीत राहील तोपर्यंत हा बुधादित्य राज योग राहणार असून त्याचा प्रभाव 12 राशीच्या लोकांवर राहणार आहे. या बुधाच्या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांसाठी या काळात अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे.

बुधादित्य राजयोगाने ‘या’ राशींचे उजळणार भाग्य

  • वृषभ
- Advertisement -

बुधाच्या संक्रमणाने तयार झालेला बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांना लाभ देईल. हा राजयोग या लोकांना धनलाभ देणारा असेल यांना अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. प्रत्येक कामात यश मिळेल.

  • कन्या

बुधादित्य राजयोग कन्या राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. काही कामानिमित्त प्रवासही करू शकता. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

  • सिंह
- Advertisement -

बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल. नव्या नोकरीची ऑफर येऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यावसायिकांनाही फायदा होईल. धनलाभ होईल.


हेही वाचा :

पैसे उडवण्यात पटाईत असतात या ‘4’ राशीच्या व्यक्ती

- Advertisment -

Manini