घरदिवाळी 2022दिवाळीनंतर 'या' तीन राशींना होणार नुकसान; व्हा सावधान

दिवाळीनंतर ‘या’ तीन राशींना होणार नुकसान; व्हा सावधान

Subscribe

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दिवशीच सूर्य ग्रहण असणार आहे. यामुळे लोकांवर सूर्य ग्रहणाचे दुष्प्रभाव पडणार आहे. हे सूर्य ग्रहण तूळ राशीमध्ये लागणार आहे या राशीमध्ये सूर्य वाईट मानला जातो. याशिवाय याकाळात तूळ राशीमध्ये सूर्यासोबत चंद्र, शुक्र आणि केतू सुद्धा असणार आहे. यामुळे सूर्य ग्रहणावेळी चतुर्ग्रही योग बनणार आहे आणि या ग्रहांवर राहूची सरळ दृष्टी पडणार आहे. हे सूर्य ग्रहण तीन राशींसाठी वाईट सिद्ध होईल.

मिथुन
मिथुन राशीमध्ये सूर्य तिसऱ्या भावाचा स्वामी असतो आणि ग्रहणावेळी ते 9 व्या भावामध्ये गोचर करेल. याकाळात मिथुन राशींचे भाग्य त्यांची साथ देणार नाही आणि कौटुंबीक आयुष्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळेल. त्यामुळे नोकरी, व्यवसामध्ये अडचणी निर्माण होतील. याकाळात मोठ्या गुंतवणूका करु नका.

- Advertisement -

तूळ
तूळ राशीमध्ये देखील सूर्य ग्रहण लागत आहे आणि या राशीमध्ये चतुर्ग्रही योग बनत आहे. या राशींच्या व्यक्तिंनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होई शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर
मकर राशीमध्ये सूर्य आठव्या स्थाचा स्वामी असतो. मकर राशीच्या कर्म भावामध्ये असल्यामुळे नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना उत्तम मानला जात नाही. वडीलांची प्रकृती खराब होऊ शकते. याकाळात मोठे निर्णय घेऊ नका.

- Advertisement -

 


हेही वाचा :

दिवाळीच्या दिवशी लागणार सूर्य ग्रहण; 27 वर्षांनंतर बनतोय अद्भुत संयोग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -