घरभक्तीBuddha Purnima 2023 : कधी आहे बौद्ध पौर्णिमा? या दिवशी असेल वर्षातील...

Buddha Purnima 2023 : कधी आहे बौद्ध पौर्णिमा? या दिवशी असेल वर्षातील पहिले चंद्रग्रहण

Subscribe

वैशाख महिन्याची पौर्णिमा हिंदू धर्मियांसोबतच बौद्ध धर्मियांसाठी देखील खास मानली जाते. कारण या दिवशी गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जाते. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा देखील म्हटलं जातं. यंदा 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. तसेच या दिवशी चंद्रग्रहण देखील असणार आहे. ज्यामुळे या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा खास संयोग या दिवशी पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख पौर्णिमा 4 मे रोजी रात्री 11:44 वाजता सुरु होणार असून 5 मे रात्री 11:03 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 5 मे रोजी पौर्णिमा साजरी केली जाईल.

बौद्ध पौर्णिमेला असणार चंद्रग्रहण

Lunar Eclipse 2022: देव दीपावली पर लगेगा साल का आखिरी और दूसरा चंद्र ग्रहण, जानें ग्रहण से जुड़ी जरूरी बातें - Lunar eclipse 2022 in day of dev Deepawali know Chandra grahan

- Advertisement -

 

वर्षातील पहिले चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमा/ बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. हे 5 मे रोजी रात्री 8.45 ते 5 आणि 6 च्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत असेल. याआधी 5 मे च्या सूर्योदयापासून सकाळी 9:17 पर्यंत सिद्धी योग राहील. या दिवशी स्वाती नक्षत्रही राहील. स्वाती नक्षत्र हे सकाळपासून रात्री 9:40 पर्यंत आहे. अशाप्रकारे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.51 ते दुपारी 12:45 पर्यंत आहे.

एवढेच नाही तर वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भाद्रची सावली राहील. सकाळी 05:38 ते 11:27 पर्यंत आहे.

 


हेही वाचा :

100 वर्षांनंतर घडणार अद्भूत योगायोग; 3 वेगवेगळ्या रुपात दिसणार सूर्यग्रहण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -