जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- लोकांच्या सहवासाने तुमचा उत्साह वाढेल. व्यवसायात जम बसेल. राजकारणात तुमचे महत्त्व वाढेल.

वृषभ :- कोर्ट कचेरीच्या कामात यश येईल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. घरगुती वातावरण आनंदी ठेवता येईल.

मिथुन :- चिडचिड न करता कामे करा. चहापाणी झाल्यावर तुमच्या विचारांना चालना मिळेल. अडचण दूर करता येईल.

कर्क :- ठरविलेल्या कार्यक्रमात अचानक बदल करण्याची वेळ येऊ शकते. पोटाची काळजी घ्या. पर्स सांभाळा.

सिंह :- घरगुती कामे करण्यात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखण्यास तुमचे कौतुक होईल. नम्रपणे समस्या सोडवा.

कन्या :- मनावर दडपण येईल. जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. वाद होईल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा.

तूळ :- रेंगाळत राहिलेले काम करून घेता येईल. नोकरीतील तणाव दूर करण्याचा मार्ग मिळेल. गोड बोला.

वृश्चिक :- बोलण्यात कडवटपणा न ठेवता समस्या सोडवा. प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर चर्चा सफल होईल. स्पर्धेत प्रगती.

धनु :- नव्या लोकांच्या सहवासाने नवा उत्साह निर्माण होईल. प्रवासाचा आनंद घ्याल. आवडते पदार्थ मिळतील.

मकर :- प्रश्न सोडवण्याची पद्धत बदलता येईल. कोर्टाच्या कामात मदत मिळेल. जवळची माणसे आधार देतील.

कुंभ :- नवीन विषयात रस घ्याल. स्पर्धेत जिंकाल. आवडत्या पदार्थांची गोडी चाखण्यास मिळेल.

मीन :- धंद्यात प्रश्न निर्माण होईल. गोड बोलून रहा. प्रवासात घाई नको. खिसा-पाकीट सांभाळा.