घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य; शनिवार - १ जून २०१९

राशीभविष्य; शनिवार – १ जून २०१९

Subscribe

मेष :- तुम्ही ठरविल्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. प्रेमाने प्रश्न सोडवा. जबाबदारी स्विकारावी लागेल.

वृषभ :- महत्त्वाच्या वस्तु सांभाळा. घरातील वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्या.

- Advertisement -

मिथुन :- आजचे काम उद्यावर टाकू नका. मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल. वरिष्ठांना दुखवू नका.

कर्क :- रागावर नियंत्रण ठेवल्यास सर्व कामे नीट पूर्ण करू शकाल. धंद्यात गोड बोला. गिर्‍हाईक सांभाळता येईल.

- Advertisement -

सिंह :- मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. नोकरीतील तणाव कमी होईल. घरात आनंदीपणा राहिल.

कन्या :- धावपळ, दगदग नातलगांच्यासाठी करावी लागेल. अधिकार प्राप्तीसाठी आश्वासन राहिल.

तूळ :- घरातील कामे होतील. भेटीत यश मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल.

वृश्चिक :- प्रवासात घाई करू नका. सौम्य धोरण ठेवा. मोठ्या लोकांची मदत घेता येईल.

धनु :- आजचे काम उद्यावर टाकू नका. वरिष्ठांचा राग समजून त्याप्रमाणे वागता येईल. धंद्यात तेजी येईल.

मकर :- आपले पणाची भावना निर्माण झालेल्या माणसांची मैत्री दृढ होईल. धंद्यात नवा पर्याय शोधता येईल.

कुंभ :- जुने मित्र भेटतील. थकबाकी वसूल होईल. धंद्यात चांगला जम बसेल. खरेदी कराल.

मीन :- कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. प्रतिष्ठा वाढेल. उद्योगात नवा मार्ग मिळेल. पैसा साठवून ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -